सध्या फ्रान्समध्ये ७७ वा ‘कान चित्रपट महोत्सव’ सुरू आहे. या महोत्सवात ५० वर्षांनंतर एका भारतीय चित्रपटाचं स्क्रीनिंग केलं जाणार आहे. हा चित्रपट म्हणजे श्याम बेनेगल यांचा गाजलेला चित्रपट ‘मंथन’ होय. यंदाच्या ‘कान’ मध्ये हा चित्रपट दाखवला जाणं हा भारतीय सिनेमासाठी जागतिक स्तरावर एक महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल. सॅल ब्युनूएल इथं शुक्रवारी (१७ मे रोजी) या चित्रपटाचं स्क्रीनिंग होईल.

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका असलेला ‘मंथन’ हा या वर्षी महोत्सवाच्या कान क्लासिक विभागात निवडला गेलेला एकमेव भारतीय चित्रपट आहे. भारतातील श्वेतक्रांतीचे जनक अशी ओळख असलेल्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या दूध सहकारी चळवळीवर आधारित असा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती गुजरात को- ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या (GCMMF) दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती.

Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Ladki Bahin Yojana Pune, Pune District women Ladki Bahin, Ladki Bahin Yojana benefit,
Ladki Bahin Yojana Pune : पुणे जिल्ह्यात ५० हजार ‘बहिणी’ ‘लाडक्या’ होण्याच्या प्रतीक्षेत!
Farmer Viral Video
शेतकऱ्यांनो तुम्हीही कांद्याचं पिकं घेतलंय का? वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्
Kolhapurs short film Deshkari highlighting farmers and soldiers won Filmfare OTT and Jury Awards
कोल्हापुरातील देशकरी लघुपटाला फिल्मफेअर पुरस्कार

“शेवटच्या क्षणापर्यंत ती म्हणत राहिली ‘तो तुला सोडून जाईल’,” सुप्रिया पाठक यांच्या प्रेमविवाहाला आईचा होता विरोध

‘मंथन’ हा लोकांनी दिलेल्या देणगीतून निर्मिती करण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट आहे. जवळपास पाच लाख शेतकऱ्यांनी या चित्रपटासाठी प्रत्येकी दोन रुपये दान केले होते. विजय तेंडुलकर आणि डॉ. कुरियन यांनी चित्रपटाची कथा लिहिली होती. स्मिता पाटीलशिवाय नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, कुलभूषण खरबंदा, मोहन आगाशे, अनंत नाग आणि अमरीश पुरी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला १९७७ साली सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी विजय तेंडुलकर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्या वर्षी भारताने ऑस्करसाठी हा सिनेमा पाठवला होता.

Manthan Cast
(Image Credit: Film Heritage Foundation/Sanjay Mohan)

दरम्यान प्रकृतीसंबंधित काही कारणांनी श्याम बेनेगल कान महोत्सवाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार नाहीत, परंतु त्यांची पत्नी नीरा तिथे हजर असतील. त्यांच्याबरोबर नसीरुद्दीन शाह, दिवंगत स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर आणि त्यांच्या बहिणी उपस्थित राहणार आहेत. डॉ वर्गीस कुरियन यांची मुलगी निर्मला कुरियनदेखील महोत्सवात सहभागी होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘कान’ मधून परतल्यावर भारतातील ४० शहरांमध्ये ‘मंथन’ चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार सुरू आहे, असं राजस्थानच्या डुंगरपूर राजघराण्याचे शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांच्या नेतृत्वाखालील फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने म्हटलंय.

विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

‘मंथन’ चं कानमध्ये खास स्क्रीनिंग होतंय, त्याबद्दल श्याम बेनेगल यांनी आनंद व्यक्त केला. “फिल्म हेरिटेज फाऊंडेशन गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या मदतीने मंथन रिस्टोअर करणार आहे हे शिवेंद्रने सांगितल्यावर मला खूप आनंद झाला. मंथन हा माझ्या खूप जिव्हाळ्याचा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी पाच लाख शेतकऱ्यांनी आर्थिक मदत केली होती,” असं श्याम बेनेगल म्हणाले.

१९७६ साली प्रदर्शित झालेल्या ‘मंथन’चं शूटिंग गुजरातच्या छोट्या सांगनवा नावाच्या खेडेगावात करण्यात आलं होतं. “याठिकाणी शूटिंग करताना मी कलाकारांना ४० ते ४५ दिवस तेच कपडे घालण्यास सांगितलं होतं. “आम्ही शूटिंग केलं, त्या भागात फार पाणी नव्हतं. इथले लोक बरेच दिवस आंघोळ न करता राहायचे, त्यामुळे मी नसीर, स्मिता, गिरीश, अमरीश व इतरांना सांगितलं हेच कपडे वापरायचे. जर कपड्यांमधून दुर्गंधी आली, तर ती सर्वांच्याच कपड्यांमधून येईल,” असं श्याम बेनेगल म्हणाले होते.

smita patil manthan
(Image Credit: Film Heritage Foundation/Sanjay Mohan)

‘अंकुर’ आणि ‘निशांत’ नंतर ‘मंथन’ हा श्याम बेनेगल यांचा तिसरा चित्रपट होता. भारतातील सर्वात यशस्वी सहकारी चळवळीवर बेतलेल्या या चित्रपटात दूध उत्पादन आणि दूध गोळा करण्याची क्रांती दाखवण्यात आली आहे. अमूलची सुरुवात डॉ. वर्गीस कुरियन यांनी केली होती. त्यांनी अमूल ही नोडल एजन्सी स्थापन केली होती. या एजन्सीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडलं होतं. याचे खूप चांगले परिणाम त्यावेळी दिसून आले होते. हा चित्रपट याच विषयावर आधी आलेल्या दोन माहितीपटांनंतर आला होता. “डॉ. कुरियन यांना वाटलं की अमूलची कथा आणि शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थेने प्रत्यक्ष केलेलं काम, यातून ‘मंथन’ तयार झाला,” असं श्याम बेनेगल म्हणाले होते.

तब्बू – अनवट वाटेवरची वलयांकित नायिका

‘मंथन’ या चित्रपटाची सुमारे ५० वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली होती. या चित्रपटाचं शूटिंग करताना कलाकार सर्किट हाऊसमध्ये राहिले होते. ‘भिंती रंगवून ती जागा स्वच्छ करून तिथे टॉयलेट ब्लॉक्स तयार केले होते. गावात शौचालये नव्हती, तिथले लोक शेतांमध्ये जायचे. इतकंच नाही तर आम्ही मुंबईहून आणलेले स्वयंपाक करणारेही इथे फार काळ टिकले नाहीत, त्यामुळे इथे राहणं जरा अवघड झालं होतं, अशी आठवण श्याम बेनेगल यांनी सांगितली. “अमरीश पुरी पहाटे साडेपाचला उठायचे आणि सगळ्यांना पीटी करायला लावायचे, त्यांच्यामुळे आमची प्रकृती चांगली राहिली. सगळेजण त्या गावाचा एक भाग झाले आणि आता मी म्हातारवयात बसून हे म्हणू शकतो की, आम्ही तो चित्रपट केलाय,” असं श्याम बेनेगल अभिमानाने सांगतात.

Story img Loader