बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे. इरफान खान हे अशा कलाकारांपैकी एक आहेत. अनेक चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारत त्यांनी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. आता लेखक मनू ऋषी यांंनी एका मुलाखतीदरम्यान, इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

काय म्हणाला अभिनेता?

एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता आणि लेखक मनु ऋषी यांनी इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. इरफान खान यांनी एका डायरेक्टरसाठी कथा लिहिण्याचे सूचवले होते, याची आठवण सांगितली आहे. ते म्हणतात, “एका दिग्दर्शकासाठी मी एक कथा लिहिली होती. जेव्हा दिग्दर्शकाबरोबर माझी भेट झाली, त्यावेळी त्यांनी प्रोजेक्ट देण्याआधी टेस्ट म्हणून मला एक सीन लिहायला सांगितले. मी त्या दिग्दर्शकाला म्हटले की, एक तर तुम्हाला माझ्या कामावर विश्वास ठेवायला लागेल किंवा इरफानने जे सूचवलं आहे, त्यावर विश्वास दाखवायला लागेल.

rekha artpita khan diwali party video
Video : मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सलमानची अनुपस्थिती, रेखा यांनी केली अर्पिताची विचारपूस; व्हिडीओ झाला व्हायरल
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Shabana Azmi And Mahesh Bhatt
“त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात…”, शबाना आझमींनी सांगितली ‘अर्थ’ चित्रपटावेळची दिग्दर्शकाची आठवण; महेश भट्ट म्हणालेले, “मृत्यू जवळ अनुभवण्यासारखं…”
ratan tata simi garewal affair
एकेकाळी रतन टाटा होते ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात, पण होऊ शकलं नाही लग्न
marathi actress suhas joshi
व्यक्तिवेध: सुहास जोशी
Govinda wanted to marry neelam kothari
‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला गोविंदा, रागात सुनीताशी मोडला होता साखरपुडा अन्…
Tamil filmmaker slapped Padmapriya publicly
दिग्दर्शकाने सर्वांसमोर कानाखाली मारली अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
Mukesh Khanna Rejects Ranveer Singh for Shaktimaa
रणवीर सिंह ‘या’ भूमिकेसाठी माझ्यासमोर बसला होता तीन तास, शक्तिमान फेम अभिनेत्याच वक्तव्य; म्हणाला “त्याच्या चेहर्‍यावर…”

तुम्ही माझे काम पाहिले नाही, नाहीतर तुम्ही असा प्रश्न विचारला नसता. जर मी तुम्हाला एखादा सीन दिग्दर्शित करायला सांगितला, तर तुम्हाला कसे वाटेल? त्यावर दिग्दर्शकाने मला सांगितले की, मी सहा चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मी त्याला म्हटले, मी ११ चित्रपटांसाठी कथा लिहिल्या आहेत. तुम्ही माझे काम पाहिले नाही, म्हणून मी नाराज नाही; तर इरफानने सांगितलेल्या गोष्टींवरदेखील तुम्ही विश्वास ठेवला नाही, याचे मला वाईट वाटत असल्याचे मी त्यांना म्हटले.”

हेही वाचा: हुबेहुब राज ठाकरे, तेजस्विनी पंडित अन् शूटिंगचा सेट; अभिनेत्री आणणार मनसे प्रमुखांवर चित्रपट? ‘तो’ फोटो व्हायरल

पुढे ते म्हणतात, “त्या रात्री इरफान माझ्याकडे आला आणि मी स्वत:ची बाजू ठामपणे मांडल्याबद्दल माझे कौतुक केले. मी दरवाजा उघडला आणि इरफान मला म्हणाला की, एक तर मरून जाशील किंवा तरून जाशील, तू आज जे काही केलेस ते बरोबर होते; असे इरफानने म्हटले होते.” अशी आठवण मनु ऋषी यांनी सांगितली आहे.

इरफान खानला मी त्याच्या निधनाआधी शेवटचे भेटू शकलो नाही, हे सांगताना मनु ऋषी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणतात, “मी इरफानला शेवटचे भेटू शकलो नाही, मात्र त्याच्या निधनानंतर त्याला स्वत:च्या हातांनी दफन करू शकलो. करोना काळात इरफानचे निधन झाले होते, त्यावेळी कोविडच्या निर्बंधांमुळे तेथील अधिकारी कोणालाही दफनभूमीच्या आत जाऊ देत नव्हते. तो अधिकारी काही माझ्या ओळखीचा नव्हता, पण त्याने मला आत जाऊ दिले. इरफानला दफन करण्याआधी माझ्या स्वत:च्या हाताने मी त्याच्या शरीरावर चंदन ठेवले”, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.

इरफान खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर १९८८ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्याला त्यानंतर काही वर्षे चित्रपटसृष्टीत काम मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला.

हेही वाचा: Video : …अन् सगळे सदस्य ढसाढसा रडले! ‘बिग बॉस’च्या घरात भावनिक संवाद; नेटकरी म्हणाले, “सूरजला पाहून खूप…”

मात्र, नंतरच्या काळात त्याने ‘कारवा’, ‘हिंदी मीडियम’, ‘अंग्रेजी मीडियम’ , ‘ब्लॅकमेल’, ‘पझल’, ‘मर्डर अ‍ॅट तिसरी मंझील’, ‘सात खून माफ’, ”न्यू यॉर्क’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे इरफान खानने फक्त भारतीय चित्रपटांत काम केले असे नव्हे, तर ब्रिटीश व अमेरिकन चित्रपटांतदेखील त्याने महत्त्वाचे योगदान दिले.

जगभरातील उत्तम कलाकारांमध्ये त्याची गणना केली जाते. चित्रपटसृष्टीतील ३० वर्षांच्या कारकिर्दीत इरफान खानला सहा फिल्मफेअर अवॉर्ड, आशियन फिल्म अवॉर्ड व राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान देणारा हा अभिनेता २०२० मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी अनंतात विलीन झाला.