२०१७ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूक्समुळे चर्चेत असते. २०२२ मध्ये तिचा पहिला बॉलिवूड चित्रपटही प्रदर्शित झाला. तिने अक्षय कुमारबरोबर ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सगळ्या तिच्या कामामुळे तिचा चाहतावर्गही भरपूर मोठा आहे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं खास कारण म्हणजे तिचं अफेअर.
मानुषीने आतापर्यंत कधीही तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल जाहीर खुलासा केलेला नाही. पण आता ती एका व्यावसायिकला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ती भारतातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी झिरोधाचा सह-संस्थापक निखिल कामथ याला डेट करत आहेत.
आणखी वाचा : “हा अन्याय…”; सैफ अली खानने उघड केलं सोशल मीडियावर सक्रिय नसण्यामागील कारण
मानुषी आणि निखिल यांनी त्यांच्या नात्याबद्दल गुपित राखलं असंल तरी दोघेही अनेकदा एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्याचं समोर आलं आहे. नुकतंच दोघ एकत्र ऋषिकेशला फिरायला गेले होते असं त्या दोघांच्या जवळच्या एका व्यक्तीने एका वृत्तवाहिनीला सांगितलं.
आजवर तिचं नाव कुणासोबतही जोडलं गेलं नव्हतं. दरम्यान मानुषी आणि निखिल कामथ यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं असलं तरी दोघांकडूनही या वृत्तावर अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेलं नाही. सध्या, मानुषीला तिच्या करीअरवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे तिला तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मीडियासमोर खुलासा करायचा नसल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच मानुषी आणि निखिल यांच्या कुटुंबियांमध्येही जवळचे संबंध आहेत. दोन्ही कुटुंबीयांनादेखील त्यांच्या नात्याबद्दल तसंच त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा रंगू नये अशी इच्छा आहे.
हेही वाचा : “फक्त ३५ सेकंदांचा टीझर पाहून…”; क्रिती सेनॉनचं ‘आदिपुरुष’ला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर
व्यवसायिक निखिल कामथने बंगळूरमधील उद्योजिका अमांडा पूर्वांकरा हिच्यासोबत १८ एप्रिल २०१९ ला इटलीमध्ये लग्न केलं होतं. मात्र वर्षभरातच दोघेही विभक्त झाले. आता तो मानुषी छिल्लरला डेट करत आहे. आता ही दोघं त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे मनुषीचे चाहते लक्ष लावून आहेत.