अभिनेता अजय देवगण सध्या चर्चेत आहे, ‘थँक गॉड’ या त्याच्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अजय देवगणने सातत्याने वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्याप्रमाणे तो उत्कृष्ट दिग्दर्शकदेखील आहे. अजयचा सध्या आणखीन एक चित्रपट चर्चेत आहे तो चित्रपट म्हणजे ‘दृश्यम २’, २०१४ साली आलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा हा पुढचा भाग असणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. आता याच चित्रपटातील एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

अजय देवगण किंग या फेसबुकपेजने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दृश्यम २ चित्रपटातील अजयने साकारलेल्या पात्राचे कुटुंब दिसत आहे. ‘चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस’ असे कॅप्शन दिला आहे. या फोटोवर अनेकजण कॉमेंट करत आहेत. मराठमोळा अभिनेता अंशुमन विचारेनेदेखील कॉमेंट केली आहे. त्याने लिहले आहे, ‘मला अत्यंत आवडलेली अजयजी तुमची ही फिल्म’, या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमेरिकेत प्रियांकाने ‘या’ पद्धतीने साजरा केला करावा चौथ! फोटो चर्चेत

मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेता अंशुमन विचारे, नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमात अंशुमनने काम केले आहे. ‘फु बाई फु,सारख्या विनोदी मालिकेने तो घराघरात पोहचला आहे’. पोश्टर बॉईजसारख्या चित्रपटातून त्याने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. अंशुमनच्या मुलीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.

दृश्यम २’ हा अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ‘दृश्यम २’मध्ये काय होणार हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. सगळेजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटातील तब्बूचा फर्स्ट लूकच पोस्टर प्रदर्शित झालं आहे. दुसरा भाग येत्या १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader