बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान हा सध्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची मराठी कलाकारांनाही भूरळ पडली आहे. ‘धर्मवीर’ चित्रपट फेम अभिनेता क्षितीश दातेने या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता क्षितीश दाते हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “पांढरे कपडे घालून खुर्चीवर…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा स्टँप पेपर घोटाळ्याच्या मुख्य आरोपीबद्दल मोठा खुलासा, म्हणाला “मी अब्दुल करीम तेलगीला…”
“जवान बघितला. डिओपी, एडिटर आणि एकूणच टेक्निकल आर्टिस्ट टीमला डोक्यावर घेऊन वरात काढायला हवी. फारच सुंदर. बाकी मौज”, अशी पोस्ट क्षितीश दातेने केली आहे.
दरम्यान ‘जवान’ चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. याबरोबर नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या कॅमिओ भूमिकेत पाहायला मिळत आहे. हा चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ, तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.