बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया देशमुख ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा ते दोघेही मजेशीर रिल व्हिडीओ करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच रितेश आणि जिनिलिया या दोघांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितेश आणि जिनिलियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ते दोघेही कुठेतरी फिरायला गेल्याचे दिसत आहे. यात जिनिलिया ही कोणत्या तरी विचारात मग्न असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : “आमचे नाते पक्के होणार होतं पण तेव्हाच…”, रितेश देशमुखने उघड केले गुपित
त्यावेळी रितेश हा तिच्या मागून चालत येतो आणि तिला विचारतो, “मला माहिती आहे, तू माझ्याबद्दल वाईट विचार करत आहेस?” त्यावर जिनिलिया म्हणते, “वाईट…! तुझ्याबद्दल विचार करतंच कोण?” तिची ही प्रतिक्रिया ऐकून रितेश देशमुखला धक्का बसतो. यावेळी रितेशच्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : Video : …अन् पुरस्कार मिळाल्यानंतर रितेश देशमुख जिनिलीयाच्या पडला पाया
रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर कमेंट करताना दिसत आहेत. तर काहींनी रितेश आणि जिनिलिया या जोडीचे कौतुक केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.