रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपटात वीर सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा झळकणार आहे. तर वीर सावकरांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे पाहायला मिळणार आहे. तसेच आता महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांची भूमिका कोण साकारणार? हे समोर आलं आहे.
नुकतंच ‘झी स्टुडिओ’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांच्या पहिल्या लूकचा पोस्टर शेअर करण्यात आला आहे. अभिनेता राजेश खेरा महात्मा गांधींच्या भूमिकेत पाहायला मिळाला. तर सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत मराठी सिनेसृष्टीतला दिग्गज अभिनेता झळकला.
या पोस्टरमधील सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत असलेले हे सचिन पिळगांवकर आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर झळकणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सचिन पिळगांवकरची छोटी झलक पाहायला मिळाली होती. पण सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेतील सचिन पिळगांवकरचं आहेत का? हे मात्र ओळखन कठीण होतं. अखेर पोस्टर समोर आल्यामुळे सचिन पिळगांवकर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात पाहायला मिळणार, हे निश्चित झालं आहे.
हेही वाचा – ‘या’ गोंडस चिमुकलीला ओळखा पाहू! मराठी सिनेसृष्टीतली ही लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच अडकली लग्नबंधनात
दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे. मराठी व हिंदी या दोन्ही भाषेत पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटात वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी अभिनेता सुबोध भावेने आवाज दिला आहे.