बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल अभिनेते शरद पोंक्षेंनी पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात. नुकतंच शरद पोंक्षेंनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने अक्षय कुमारच्या ओह माय गॉड या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : “नितीन देसाईंची घटना, राजकारण्यानी बुडवलेले पैसे अन्…”, प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी फोटोग्राफरच्या जिवाला धोका, म्हणाला “त्याच्याबद्दल काही पुरावे…”

“प्रत्येकानं अवश्य पहावा असा सिनेमा”, असे शरद पोंक्षेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरही त्यांनी कमेंट केली आहे.

“सनातनी असल्याचा अभिमान आहे…ह्या चित्रपटातून जो विषय मांडला आहे तो खरच खूप गंभीर आणि महत्त्वाचा आहे.. आणि असा विषय मांण्यासाठी फक्त आणि फक्त हिंदू धर्माचा, ग्रंथाचा असारा घेतला कारण सनातन धर्म प्राचीन तर आहेच पण प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आहे.. हा गंभीर विषय मांडताना इतर धर्माचा कुठेच आधार नाही घेतला जस omg घेतला होता”, असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे. त्यावर शरद पोंक्षेंनी “अगदी बरोबर” असे म्हटले आहे.

शरद पोंक्षेच्या पोस्टवरील कमेंट

आणखी वाचा : OMG 2 Box Office Collection; अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ ची बॉक्स ऑफिसवर जादू फिकी; पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद

दरम्यान ‘ओह माय गॉड २’च्या ट्रेलरलाही लोकांनी पसंती दर्शवली आहे. या चित्रपटातील अक्षयचा लूकही प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारबरोबर पंकज त्रिपाठी, गोविंद नामदेव, यामी गौतम हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ४३ कोटींचा गल्ला जमवला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sharad ponkshe post after watch akshay kumar oh my god 2 movie nrp
Show comments