आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘सर्कस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो रणवीर सिंगबरोबर काम करताना दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यावरच आता अभिनेत्याने भाष्य केलं आहे.
सिद्धार्थ जाधव रोहित शेट्टीबरोबर गोलमाल चित्रपटापासून काम करत आहे. ‘सर्कस’ चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. यावर सिद्धार्थ हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना असं म्हणाला, “कधी कधी सचिन तेंडुलकरसुद्धा शून्यावर आउट झाला आहे याचा अर्थ असा नाही की तो वाईट आहे. याआधीच्या सामन्यांची मज्जा घेतली होती. त्यामुळे पुढेचे सामने चांगले खेळतील.”
मसाबाच्या लग्नानंतर नीना गुप्तांनी लेकीला दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला; म्हणाल्या…
सिद्धार्थ पुढे म्हणाला, “आम्ही मनोरंजन व्यवसायात आहोत आणि आमच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आमचे ध्येय आहे. पण मला असं वाटत, प्रेक्षकांच्या रोहित शेट्टींकडून खूप अपेक्षा होत्या मात्र आता आम्ही सर्वोत्तम देण्याचे प्रयत्न करू” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
सर्कस’ हा चित्रपट बिग बजेट होता. मात्र चित्रपटाला पहिल्याच दिवशीपासून थंड प्रतिसाद मिळत होता. या चित्रपटात रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, अश्विनी काळसेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर दीपिका पदुकोणचीही झलक या चित्रपटात पहायला मिळाली होती.