मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ जाधवचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचा ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सिद्धार्थने आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आज त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील काम केले आहे. याच अभिनेत्याला एक भयावह भूमिका विचारण्यात आली होती.
मराठमोळ्या सिद्धार्थने नुकतीच बोल भिडू यांना मुलखात दिली आहे, ज्यात त्याने त्या भूमिकेविषयी माहिती दिली. तो असं म्हणाला, “‘तुंबाड’ चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला, मात्र या चित्रपटासाठी मी २००३, २००४ च्या आसपास ऑडिशन दिली होती. तेव्हा मी ‘लोच्या झाला रे’ हे नाटक करत होतो. या चित्रपटाचा दिग्दर्शक राही बर्वे याने मला बोलवून माझ्याकडून हस्तरच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतली. त्याने मला वेगवेगळ्या पद्धतीने चालण्यास सांगितले मी त्यापद्धतीने त्याला चालून दाखवले. मला माहितदेखील नव्हते नेमकं काय करायचं आहे. त्यामुळे तुमच्या दिसण्याचा लोक कशा पद्धतीने विचार करू शकतात हे कळले.” या मुलाखतीत त्याने इतर अनेक विषयांवर चर्चा केली आहे. ‘तुंबाड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. यातील हस्तर ही एका राक्षसी भूमिका होती.
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?
आता सिद्धार्थ जाधवचा बालभारती हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या तो व्यस्त आहे. या चित्रपटात मुलांच्या कलागुणांना वाव देताना भाषेच्या अडचणीमुळे ते मागे न पडता ते पुढे जायला हवेत यावर भाष्य केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, अभिजित खांडकेकर, नंदिता धुरी हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नितीन नंदन यांनी केले आहे.
सिद्धार्थने आपल्या करियरची सुरवात एकांकिका, नाटकांपासून केली. पुढे त्याने मालिका चित्रपटांमध्ये काम केले आहे. दे धक्का, हुप्पा हुय्या, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय असे वेगवगळ्या धाटणीचे चित्रपट केले तर रोहित शेट्टीच्या गोलमाल चित्रपटातून त्याने हिंदीत पदार्पण केले. आता तो सर्कस या हिंदी चित्रपटात दिसणार आहे.