मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव, गेली अनेकवर्ष तो सातत्याने मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. मात्र आता त्याने हिंदीत आपले स्थान निर्माण केले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या आगामी हिंदी चित्रपटात तो आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार मंडळी दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टी ओळखले जातात. मागच्या वर्षी आलेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता त्यांचा नवा चित्रपट येत आहे ज्याचं नाव आहे ‘सर्कस’. सिद्धार्थने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटनवरून त्याने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. “आला रे आला सर्कस आला” असा कॅप्शन त्याने दिला आहे पोस्टरमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार दिसत आहेत. यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसत आहे.

खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा ‘देवयानी’ मालिका होणार प्रक्षेपित; जाणून घ्या तारीख

या चित्रपटात रणवीर सिंगच्या बरोबरीने पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस, वरुण शर्मा, अश्विनी काळसेकर, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव आदी कलाकार असणार आहेत. हा चित्रपट १९८२ साली आलेल्या ‘अंगूर’ चित्रपटाचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे. अजय देवगण या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.

करोना काळात चित्रपटगृह बंद असल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले मात्र आता चित्रपट २३ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा तो रणवीरबरोबर धमाल करताना दिसणार आहे.