मराठी कलाविश्वात गेल्या आठवड्यात एका किशोरवयीन मुलाचं आत्मचरित्र असलेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. याशिवाय बॉलीवूडमध्ये सरदार जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित ‘मिशन रानीगंज’ चित्रपट प्रदर्शित झाला. ‘मिशन रानीगंज’मध्ये बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारने प्रमुख भूमिका साकारली आहे. या दोन्ही चित्रपटांना सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटासाठी अनेक मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या आहेत.

हेही वाचा : ‘होणार सून मी या घरची’ : प्रेक्षक जान्हवीला पैसे द्यायचे ते ‘काहीही हं श्री’ व्हायरल कसं झालं?, शशांक केतकरने सांगितल्या आठवणी…

mallika sherawat share harassement experience
“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Govinda wanted to marry neelam kothari
‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला गोविंदा, रागात सुनीताशी मोडला होता साखरपुडा अन्…
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
mns protest against pakistani actor film the legend of maula jatt in nashik
पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात

अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी ‘आत्मपॅम्फ्लेट’ आणि ‘मिशन रानीगंज’ असे दोन्ही सिनेमे पाहिले. हे दोन्ही चित्रपट कसे आहेत? याबद्दल अभिनेत्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे मत मांडलं आहे.

हेही वाचा : Ganpath Trailer: टायगर-क्रितीचा अ‍ॅक्शन अवतार अन् अमिताभ बच्चन यांची धडाकेबाज एन्ट्री, ‘गणपत’चा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट

एकमेकांहुन पूर्ण भिन्न शैलीचे, भिन्न विषयांवरचे दोन सिनमे गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाले…

पहिल्याच दिवशी दोन्ही पाहिले..

‘आत्मपॅम्फ्लेट’कडून अपेक्षा होतीच, कारण लेखक परेश मोकाशी…ती सार्थ ठरली…छान सिनेमा…अत्यंत मजेदार शैलीत गुदगुल्या करत करेक्ट आरसा दाखवणारा..पहावाच असा!!

(बरं roald dahi लिखीत लघुकथांवर आधारीत वेस ॲंडरसनने दिग्दर्शित केलेल्या काही शॉर्टफिल्म्स नेटफ्लिक्स वर आल्यात त्यासुध्दा पहा… यांची आणि ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या कथनशैलीची जातकुळी काहीशी सारखीय म्हणून आठवलं.)

दुसऱ्या “मिशन रानीगंज”कडून काहीच अपेक्षा नव्हती.. कारण जरा अक्षय हुकलाय सध्या…आणि ट्रेलरमधेच डी ग्रेड दिसणारे ते व्हीएफएक्स… काला पथ्तरची बिघडलेली आवृत्ती असावी असा अदमास बांधला जात होता… पण या सिनेमानेही सुखावलं… अडीचतास गुंतवुन ठेवलं.. मजा आणली…

अक्षयचाच एयरलिफ्ट जसा आवडला होता तसा हा आवडला…

पण व्हीएफएक्स असे अतिशय टुकार, ड दर्जाचे का असावेत ? स्वतः अक्षय हिरो आहे… उत्तम सहअभिनेते आहेत, आणखी काही चांगली नावं प्रोजक्टसोबत जोडलेली आहेत तरी इतके सामान्य व्हीएफएक्स ?!! पोरंसोरं हल्ली याहुन चांगले करतात रील्समधे..

पण, एकदा तो भाग दुर्लक्षित केला की, मग पुढचा सिनेमा एंटरटेनिंग आहे.. पैसा वसुल आहे..

कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, रवी किशन, सुधीर पांडे, दिब्येंदु भट्टाचार्य, शिशीर शर्मा, विरेंद्र सक्सेना, सानंद वर्मा, अरीफ झकेरीया, राजेश शर्मा अशा ‘ॲक्टर्स’ना छोट्या पण महत्वाच्या भूमिकात घेणं करेक्ट कामी आलंय… बोलके भाव चेहऱ्यावर असणाऱ्या कुत्र्याचा वापर हुकमी झालाय.. परिणीती लक्षवेधक आहे..दिग्दर्शक हुशार आहे…

तर ज्यांना आयुष्यात थिएटरमधे जाऊन सिनेमा पहाण्यातली मौज उमजलेली आहे त्यांची हे दोन सिनेमे वाट पहातायत… त्वरा करा…

हेही वाचा : “ती माझी मुलगी..”; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमधील मिस्ट्री गर्लचा विद्या बालनने केला खुलासा, म्हणाली…

दरम्यान, ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलं आहे. यामध्ये ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच ‘मिशन रानीगंज’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २.८ कोटी कमावले होते. यामध्ये अक्षय कुमार, परिणीती चोप्रा, कुमुद मिश्रा, रवी किशन, पवन मल्होत्रा, लंकेश भारद्वाज, राजेश शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.