अभिनेता रणवीर सिंहने २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॅंड बाजा बारात’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आज रणवीर त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला त्याचे चाहते आणि सेलिब्रिटींकडून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

हेही वाचा : “मासिक पाळीच्या तारखा विचारल्या” अमृता सुभाषने सांगितला ‘सेक्रेड गेम्स’मध्ये इंटिमेट सीन शूट करतानाचा अनुभव, म्हणाली…

मराठी कलाविश्वातील त्याची लाडकी मैत्रिणी अमृता खानविलकरने सुद्धा रणवीरच्या वाढदिवसानिमित्त खास इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमृता लिहिते, “माय हॉटी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुझ्या सारखं कोणीच नाहीये….” यापुढे अमृताने #fanforever असे म्हटले आहे. तसेच या स्टोरीला अमृताने रणवीरच्या आगामी चित्रपटातील “तुम क्या मिले…” हे गाणे जोडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमृता रणवीरची फार चांगली मैत्रीण आहे.

हेही वाचा : “…अन् अमिताभ बच्चन यांनी माझ्यासमोर हात जोडले”, दिग्गज अभिनेत्याने सांगितला घडलेला ‘तो’ प्रसंग, म्हणाले…

अमृताने आतापर्यंत केलेले सिनेमे, डान्स परफॉर्मन्स याचे रणवीर आवर्जुन करताना दिसतो. त्यामुळे आपल्या लाडक्या बॉलीवूड अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी अमृताने खास पोस्ट शेअर केली आहे. प्रत्यक्षात रणवीरला भेटणे शक्य नसल्याने तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करीत रणवीरचे कौतुक केले. मराठी कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींचा रणवीर फार जवळचा मित्र आहे.

अमृता खानविलकर पोस्ट
अमृता खानविलकर पोस्ट

हेही वाचा : “माझ्या कुटुंबावर टीका करून काय मिळतं?” ट्रोलर्सच्या आक्षेपार्ह कमेंट्स पाहिल्यावर करण जोहर भडकला, म्हणाला…

दरम्यान, वाढदिवसानिमित्त बॉलीवूडमधून रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. करण जोहर, आलिया भट्ट यांनीही त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. लवकरच रणवीर आलियाबरोबर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २८ जुलैला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

Story img Loader