झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे गंगा. गंगा एक ट्रान्सजेंडर असून तिचं खरं नाव प्रणीत हाटे आहे. रिअ‍ॅलिटी शोमुळे गंगा आज घराघरात पोहोचली आहे. आता ती एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा ‘हड्डी’ हा चित्रपट गेले काही दिवस खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन तृतीयपंथीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. गंगादेखील या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने तिने इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले माझ्याकडे काम नव्हते. तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. मला कामाची आवश्यकता होती, “मी काम शोधत होते. मात्र मला काम मिळत नव्हते. मात्र आज मला विश्वास बसत नाहीये मी नवाझुद्दिन सिद्दीकीबरोबर काम करत आहे. प्रत्येक अभिनेत्यासाठी हे स्वप्न आहे. नवाझ भाई बरोबर काम करण्याचा अनुभव सुंदर आहे. मला विश्वासच बसत नाहीये माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे.”

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा

‘हड्डी’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार ‘ही’ मराठी अभिनेत्री

नवाजुद्दीनने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टरमध्ये त्याच्याबरोबर गंगाही दिसत आहे. या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात ती ट्रान्सजेंडर डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे, असे तिने मुलाखतीत सांगितले आहे.

‘हड्डी’ या चित्रपटात नवाजुद्दीन स्त्री आणि तृतीयपंथी अशा दोन्ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका आहे. जवळपास ४ वर्षांपासून नवाजुद्दीन या चित्रपटावर काम करत होता. हा चित्रपट येत्या २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader