गिरीजा ओक, सध्या हे नाव चांगलंच चर्चेत आहे. कारण बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात गिरीजा झळकली आहे. त्यामुळे सध्या तिच्या कामाच कौतुक होतं आहे. शाहरुखच्या सुपरहिट चित्रपटात झळकल्यानंतर गिरीजाचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट देखील नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये तिनं इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या विषाणूशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर नंदिता गुप्ता यांची भूमिका साकारली आहे. अशा या मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमवटणाऱ्या गिरीजा ओकने अ‍ॅटलीच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एक किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा – “चॅनेल माझ्या पाठीशी आहे तुझ्या?” ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानचा राज हंचनाळेला प्रश्न, अभिनेता उत्तर देत म्हणाला…

Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

नुकतीच गिरीजाने ‘जवान’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘मॅजिक १०६.४ एफएम’ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने अ‍ॅटलीच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की, “अ‍ॅटली सरांच्या वाढदिवसानिमित्ताने चेन्नईत एका पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. खूप जण त्या पार्टीला उपस्थित होते. बराच वेळ पार्टी एन्जॉय केली. त्यानंतर मी, प्रिया, लेहेरे आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. बाकीच्या मुली आमच्या पुढे निघून गेल्या होत्या. शेवटी, शेवटी आम्ही ज्या ग्रुपमध्ये नाचत होतो, तिथे शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी होती आणि तो देखील होता. त्याआधी त्याने आम्हाला पूल टेबलवर स्टीकने बॉल कसे मारायचे हे शिकवलं होतं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही घरी जायाचं ठरवलं. मग शाहरुखने आम्हाला विचारलं, तुम्ही कसे चालला आहात? मग आम्ही त्याला सांगितलं प्रोडक्शनची गाडी आहे. त्यानंतर तो म्हणाला, थांबा थांबा. तो आम्हाला सगळ्यांना खालीपर्यंत सोडायला आला.”

हेही वाचा – Video: “आता तो गळफास…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका पुन्हा ट्रोल, नवा प्रोमो पाहून वैतागले प्रेक्षक

पुढे गिरीजा म्हणाली की, “खूप लोकांनी आधी देखील सांगितलं आहे की, शाहरुखच्या घरी गेलात किंवा कुठेही भेटलात तरी तो दारापर्यंत सोडायला येतो. त्याचप्रमाणे तो आम्हा तिघींना देखील पार्टीमधल्या गर्दीमधून एकत्र घेऊन चला चला करत सोडायला आला होता. लेहेर, प्रिया माझ्या पुढे निघून गेल्या आणि मी खूप मागे राहिले होते. कारण पार्टीत खूप लोक होती. त्याच वेळी डीओपी विष्णू माझ्या समोर आला आणि म्हणाला, तुम्ही का जाताय? असं वगैरे तो बोलत होता. याच वेळेस शाहरुख त्याच्या मागे थांबला होता माझी वाट बघतं. कारण त्याला कळलं होतं की, मी मागे थांबली आहे. मग तोच डिओपीला म्हणाला जाऊ दे तिला, खाली गाडी आली आहे. मी विष्णू आणि त्याच्या बायको बाय करून निघाले. पार्टीत खूप गर्दी होती. शाहरुखने त्या गर्दीत माझा हात धरला अन् गर्दीला बाजूला सारत मला बाहेर घेऊन गेला. ‘आंखों में तेरी’ या गाण्यामध्ये जसा दीपिका आणि शाहरुखचा तो प्रसंग होता. तसं काहीस मला झालं होतं. कारण एक हात त्याच्या हातात होता आणि मी तरंगत तरंगत पार्टीतून बाहेर पडत होते. खाली येईन पर्यंत त्याने माझा हात सोडला नाही आणि मला गाडीत बसवलं,”

Story img Loader