बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. करण जोहरच्या चित्रपटात अनेक नवे चेहरे पाहायला मिळतात. आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्षिती जोगला करण जोहरच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. करणच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपटात क्षिती दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे पोस्टर शेअर करत क्षितीने करण जोहरच्या चित्रपटात काम करणार असल्याची माहिती दिली आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंग व आलिया भट्टसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. क्षितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत सेलिब्रिटी व चाहत्यांनी आनंद व्यक्त करत क्षितीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी ६०व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात, फोटो व्हायरल

क्षिती जोगचा पती व अभिनेता हेमंत ढोमेने पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. हेमंतने रॉकी और रानी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. “आपली टायग्रेस मोठी झेप घेतेय! तुझा अभिमान वाटतो,” असं हेमंतने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> सुप्रसिद्ध मराठी संगितकाराच्या लेकाला बारावीत मिळाले तब्बल ८९.३३ टक्के, पोस्ट शेअर करत म्हणाले, “१०० पैकी…”

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केलं असून २८ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग व आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kshiti jog to play important role in karan johar rocky aur rani ki prem kahani movie kak