‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून मयुरी देशमुखकडे पाहिले जाते. ती कायमच विविध कारणाने चर्चेत असते. नुकतंच तिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
मयुरी देशमुख ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ आणि सुविचार शेअर करत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात ती, अभिनेता क्षितीश दाते आणि तिचे मित्र-मंडळी पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “…डोक्यावर घेऊन वरात काढायला हवी”, ‘पठाण’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मयुरीने शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटाचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिला. यानंतर तिने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली. “शाहरुख खानने फार चांगलं काम केले आहे. जवान फिवर”, असे मयुरी देशमुखने म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
दरम्यान ‘जवान’ चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. याबरोबर नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या कॅमिओ भूमिकेत पाहायला मिळत आहे. हा चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ, तेलगु भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.