मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीतच नव्हे तर बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही अनेक चित्रपट करत तिने आपला नावलौकिक केलं. आता ती इमरान हाश्मी आणि ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधीबरोबर ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात झळकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाव्यतिरिक्त सई ‘अग्नी’ चित्रपटातसुद्धा इमरान हाश्मीबरोबर काम करणार आहे. ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात सई नायिकेची भूमिका साकारणार आहे. पुन्हा एकदा एक्सेल एंटरटेनमेंटबरोबर काम करण्यासाठी सई उत्सुक आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना सई म्हणाली, “मला खूप आनंद होत आहे. हा एक सुंदर अनुभव आहे, कारण एक्सेल एंटरटेनमेंट एक प्रमुख प्रोडक्शन हाऊस आहे आणि सगळ्यांनाच या प्रोडक्शन हाऊसबरोबर काम करण्याची इच्छा असते. मला यांच्याबरोबर तीन वेळा काम करण्याची संधी मिळाली. ज्यात ‘डब्बा कार्टेल’पण समाविष्ट आहे. मी हेच सांगेन की माझ्या करिअरमधला हा खूप महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”

हेही वाचा… शाहरुख खानच्या मन्नतला मागे टाकत सर्वात महागडं ठरणार रणबीर कपूरचं नवीन घर? बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव

सईने इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी या दोन्ही सहकलाकारांचं भरभरून कौतुक केलं. सई म्हणाली, “इमरान आणि प्रतीक दोघंही उत्तम कलाकार आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी खूप विशेष आहे. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे आणि या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांनासुद्धा काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. मला आशा आहे की जे माझ्यासारखे कष्टकरी आहेत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतायत त्यांच्यासाठी मी नवीन संधींची दारे खुली करेन.”

हेही वाचा… उर्मिला निंबाळकरच्या नावाने टेलिग्रामवर बनावट अकाऊंट; अभिनेत्री सावध करत म्हणाली…

दरम्यान, सईच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, सई ९ फेब्रुवारी २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘भक्षक’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. तर २०२१ साली सई ‘मिमी’ या चित्रपटात क्रिती सॅनोनबरोबर झळकली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sai tamhankar in leading role with emraan hashmi pratik gandhi movie ground zero dvr