मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरेचे स्टँडअप कॉमेडी करतानाचे अनेक व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे प्रणितच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोलापूरात शो संपल्यावर प्रणितला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत त्याने माहिती दिली आहे.

बॉलीवूडमध्ये नुकताच पदार्पण केलेला अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे त्याला ही मारहाण करण्यात आल्याचं प्रणित मोरेने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘विनोदासाठी केली मारहाण’ असं कॅप्शन देत प्रणितच्या टीमने या प्रकरणाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

madhuri dixit lips turned blue while filming song pukar
माधुरी दीक्षितचे ओठ निळे पडले अन् थांबवावं लागलेलं शूटिंग…; ‘त्या’ सिनेमाला पूर्ण झाली २५ वर्षे, ‘धकधक गर्ल’ची खास पोस्ट
Khushi Kapoor
“माझा आत्मविश्वास…”, खुशी कपूरची तिच्या सौंदर्यावरून उडवली जात…
Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
Bollywood actor shah rukh khan fixes daughter suhana khan dress video viral
Video: पापाराझींसमोर लेकीचे कपडे नीट करताना दिसला शाहरुख खान, सुहानाबरोबरचा व्हिडीओ व्हायरल
shah rukh Saif Ali Khan
चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या मानेवरील जखमांचे फोटो आले समोर; नेटकऱ्यांनी केला पब्लिसिटी स्टंटचा दावा
aishwarya rai bachchan tried avoiding eye contact with ex boyfriend vivek oberoi
बच्चन घराण्याची सून झाल्यावर एक्स बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉयला पाहून ऐश्वर्या राय झालेली अस्वस्थ, नेमकं काय घडलेलं? वाचा…
Saif Ali Khan was brutally attacked by a robber (Photo- Indian Express )
Kareena Kapoor : “करीना कपूर २१ कोटींचं मानधन घेते तरीही तिला सुरक्षारक्षक आणि…”, सैफ हल्ला प्रकरणावरुन ‘या’ अभिनेत्याचा टोला
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
vicky kaushal increase weight and also learn horse riding
‘छावा’मध्ये कास्ट करण्याआधी दिग्दर्शकाने विकी कौशलला सांगितलेल्या ‘या’ दोन गोष्टी; म्हणाला, “मी ७ ते ८ महिने…”

“२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता प्रणित मोरेचा 24K क्राफ्ट ब्रूझ, सोलापूर येथील शो संपला. स्टँडअप शोनंतर प्रणित नेहमीप्रमाणे त्याच्या सगळ्या चाहत्यांना भेटण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी आला. गर्दी कमी झाल्यावर ११ ते १२ जणांचा एक गट त्याच्याजवळ आला. पण, हे लोक फोटो काढण्यासाठी आले नव्हते. त्यांनी प्रणितला मारहाण करून धमकी दिली. त्या जमावाने अतिशय क्रूरपणे प्रणितवर हल्ला केला. लाथा मारल्या, यामुळे प्रणित जखमी झाला आहे. तन्वीर शेख या टोळीचा प्रमुख होता. बॉलीवूडचा नवोदित अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे हा प्रकार घडला आहे. त्या जमावातील एकाने, “अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा” अशी धमकीही दिली आहे. त्याच्याबद्दल पुन्हा वक्तव्य केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशाराही प्रणितला देण्यात आला आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, 24K क्राफ्ट ब्रूझ याठिकाणी कोणतीही सुरक्षा नव्हती. अनेकदा विनंती करूनही ते आता सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार देत आहेत. या फुटेजमध्ये महत्त्वपूर्ण पुरावे आहेत. आम्ही पोलिसांशी देखील संपर्क साधला त्यांनी मदतीचे आश्वासन दिले पण, तसे केले नाही.” अशी पोस्ट प्रणित मोरेच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रणितने या पोस्टमध्ये सोलापुरातील शो दरम्यान वीर पहारियावर खोचक विनोद केल्याने त्याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे. वीर पहारियाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने ‘स्काय फोर्स’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली. वीर हा स्मृती शिंदे व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याच्या पहिल्याच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं. या प्रकारानंतर वीरने देखील पोस्ट शेअर करत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

Story img Loader