शाहरुख खान हा त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या ट्रेलर नाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. पठाण हिट होणार का अशा चर्चा रंगत असताना आता यावर मराठा मंदिर आणि जी ७ मल्टीप्लेक्स या चित्रपटगृहांचे मालक मनोज देसाई यांनी भाष्य केलं आहे.
मनोज देसाईंनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पठाण चालणार असं भाकीत केलं आहे. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की ‘पठाण’ चित्रपट चालणार का?’ त्यावर मनोज देसाई म्हणाले, “हो पठाण नक्कीच चालणार आमचे हिंदू बघतीलच मात्र मुस्लीम बांधवदेखील हा चित्रपट नक्की बघतील ते तर हमखास बघणार कारण आमचा परिसर हा त्यांचाच आहे. ट्रेलरवरून कळत नाही चित्रपटात नेमकं काय आहे ते बघुयात आता आपण,” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“महाविकास आघाडीचं सरकार असताना…” मुंबईच्या ट्रॅफिक समस्येबाबत ट्वीट केल्यावर सोनम कपूर ट्रोल
दरम्यान ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिका सकारत आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद याने केले असून यशराज फिल्म्सने याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचबरोबरीने राजकुमार संतोषी यांचा गांधी गोडसे हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.