प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ताने माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मसाबाचे वडील आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि तिची आई नीना गुप्ता यांच्यावर केलेल्या वर्णद्वेषी विनोदावर रमीझ राजा हसले होते, यावरून तिने संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“प्रिय रमीझ राजा (सर) सभ्यता हा गुण फक्त काही जणांकडेच असतो. माझे वडील, आई आणि माझ्यात तो खूप आहे. तुमच्याकडे तो अजिबात नाही. जगाने ३० वर्षांपूर्वी ज्या गोष्टीवर हसणं बंद केलं, अशा गोष्टींवर तुम्हाला आता पाकिस्तानमधील राष्ट्रीय टीव्हीवर हसताना पाहून वाईट वाटलं. जरा भविष्यात जगायला शिका. आम्ही तिघेही इथे अभिमानाने जगत आहोत,” असं मसाबाने तिच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मसाबाचे वडील विवियन रिचर्ड्स यांना लक्ष्य करणाऱ्या वर्णभेदी विनोदावर रमीझ राजा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. क्लिपमध्ये एक कॉमेडियन विवियन यांच्या त्वचेच्या रंगाची खिल्ली उडवताना दिसत आहे. त्यानंतर मसाबा गुप्ताने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) ही पोस्ट करत त्यांना सुनावलं.

Video: “मी असं कृत्य…”, सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला मारल्याबद्दल नाना पाटेकरांनी मागितली माफी, म्हणाले…

या शोच्या होस्टने एका महिला कॉमेडियनला विचारले की ती क्रिकेट बघते का? ती उत्तर देत म्हणाली, “मी क्रिकेट पाहते. पण जेव्हा विवियन रिचर्ड्स नीना गुप्ताबरोबर रिलेशनशिपमध्ये होते, ते पाहून मला खूप वाईट वाटलं. तेव्हा मी दोन ओळी लिहिल्या होत्या. ‘जो लड़कियां खुद को कहती हैं मलिका-ए-आलिया, उनको फिर मिलता है मिस्टर कालिया.’ या ओळींचा ढोबळ अर्थ असा की, “ज्या मुली स्वत:ला राणी समजतात, त्यांना एखादा काळ्या रंगाचा पुरुष मिळतो.” या शोमध्ये पाहुणे म्हणून रमीझ राजा आले होते, त्या महिलेने केलेल्या या टिप्पणीवर ते खूप हसत होते. यावरूनच मसाबाने संताप व्यक्त केला.

“देव सर्वोत्कृष्ट लेखक”! विराट कोहलीच्या ५० व्या शतकानंतर अनुष्का शर्माची पोस्ट; म्हणाली, “मला तुझं प्रेम…”

दरम्यान, एखाद्या पाकिस्तानी क्रिकेटपटूने अशा निंदनीय वक्तव्यांचं समर्थन केल्यामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी खेळाडू अब्दुल रझाक यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबद्दल अश्लील टिप्पणी केली होती. नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Masaba gupta lashes out on ramiz raja for laughing at racist joke about her father vivian richards and mother neena gupta hrc