प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ताने नुकतंच दुसरं लग्न केलं. अभिनेता सत्यदिप मिश्राशी तिने लग्नगाठ बांधली. याची माहिती मसाबाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत दिली होती. या फोटोमध्ये मसाबाबरोबर तिची आई नीना गुप्ता आणि वडील विवियन रिचर्ड्सदेखील दिसले. लग्नानंतर मसाबाने रिसेप्शन पार्टी दिली होती. ज्यातील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पण त्यातील मसाबा आणि सत्यदीप यांच्या लिपलॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रा यांनी लग्नानंतर बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी पार्टी दिली होती. त्या पार्टीचे बरेच फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. सोनम कपूर, दिया मिर्झा, कोंकणा सेन शर्मा यांच्यासह मसाबाचे वडील विवियन रिचर्ड्स आणि आई नीना गुप्ताही दिसले. याशिवाय या पार्टीला आलिया भट्टीची आई सोनी राजदान यांनीही हजेरी लावली होती. पण या पार्टीत मसाबा आणि सत्यदिप यांच्या लिपलॉकची सर्वाधिक चर्चा झाली.
आणखी वाचा- “मी गरोदर असताना गे व्यक्तीबरोबर…” नीना गुप्तांनी सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग
केक कटिंगच्या वेळी मसाबा गुप्ताने पती सत्यदीप मिश्राला लिप किस केलं. दोघांनी एकमेकांना आधी केक भरवला आणि त्यानंतर किस केलं. पण हे एवढ्यावरच थांबलं नाही. त्यानंतर कोणी काहीतरी बोलल्यानंतर मसाबाने पुन्हा एकदा सत्यदीपला लिप किस केलं आणि हे सर्व पाहून त्यांच्या मागे उभे असलेले मसाबाचे वडील विवियन रिचर्ड्स हसत होते. तर इतर उपस्थित लोक टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत होते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिलं, “हे हिचं दुसरं लग्न आहे?” दुसऱ्या युजरने लिहिलं, “अह्हा.. भारतीय संस्कृती.” आणखी एका युजरने लिहिलं, “एक काळ होता जेव्हा श्रीराम आपल्या वडिलांसाठी १४ वर्षं वनवासाला गेले होते. पण आज इथे वडिलांच्या समोर असं किस केलं जातंय. हेच कलियुग आहे. एवढंही मॉडर्न होऊ नका. थोडी लाज बाळगा.” याशिवाय, “बाकी सगळं घरी जाऊन करा. इथेच सुरू होऊ नका” अशीही कमेंट एका युजरने केली आहे.