बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मसाबा ही सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता व विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. मसाबा अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता मसाबाने तिचे वडील विवियन रिचर्ड्स यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त मसाबाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने दोन फोटो पोस्ट केले आहे. यातील एक फोटोत मसाबा ही वडिलांना मिठी मारताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत मसाबा ही वडील आणि नवऱ्याबरोबर पाठमोरी उभी असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : मसाबा गुप्ताने लग्नादरम्यान केलेली एक चूक पडली महागात, म्हणाली “केकमुळे…”

मसाबाने हा फोटो शेअर करत खास अंदाजात वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅड. तू चांगलंच केलंस. आम्हीदेखील खूप चांगले केले. आता मी कोणत्याही भीतीशिवाय सर्व काही करुन दाखवू शकते आणि ते करण्यासाठी मला कोणी थांबवू देखील शकत नाही”, असे कॅप्शन मसाबाने या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दल विचारताच संतापलेली वीणा जगताप

दरम्यान मसाबा गुप्ताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत विवियन रिचर्ड्स यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.