Meenakshi Seshadri : मीनाक्षी शेषाद्रीने १९८० आणि १९९० च्या दशकात ‘दामिनी’, ‘हीरो’, ‘मेरी जंग’, ‘घातक’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं. मीनाक्षी अनेकदा शूटिंगचे जुने किस्से सांगत असते. आता तिने कठीण परिस्थितीत शूटिंगचा अनुभव सांगितला. त्या काळी सेटवर स्वच्छतागृहे नसायची किंवा खूप कमी असायची, त्यामुळे अडचणींनाचा सामना करावा लागायचा. सेटवर स्वतःची व्हॅनिटी व्हॅन असलेली पहिली अभिनेत्री पूनम ढिल्लों होती. तोपर्यंत मी सिनेसृष्टी सोडण्याच्या तयारीत होते, असं मीनाक्षीने सांगितलं.

मीनाक्षीने कबीर वाणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की सेटवर जवळपास ५०-१०० लोक एकच स्वच्छतागृह वापरायचे. पुरुष आणि महिलांसाठी वेगळी स्वच्छतागृहे नसायची. “काही स्टुडिओंमध्ये फक्त एकच स्वच्छतागृह असायचे. ५० ते १०० लोक एकच स्वच्छतागृह वापरायचे, त्यामुळे वेगळे शौचालय नसायचे. फॅन्सी ड्रेसेस घातल्यावर शौचालय वापरताना खूप काळजी घ्यावी लागायची”, असं ती म्हणाली.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Shortage of public toilets in Pune city
वानवा.. स्वच्छतागृहांची
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा – “माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण

मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला सर्वात वाईट अनुभव

मुलाखतीत मीनाक्षीला तिच्या सर्वात वाईट अनुभवाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी तिने एका रोमँटिक गाण्यातील शूटिंगचा अनुभव सांगितला. हे गाणं तिला पावसात शूट करायचं होतं आणि तिला अतिसार झाला होता. “एके दिवशी मला अतिसार झाला होता, तो शूटिंगचा सर्वात वाईट दिवस होता. त्या परिस्थितीतही मी अभिनय करत होते, पावसात रोमँटिक गाणं शूट करायचं होतं”, असं मीनाक्षी म्हणाली.

हेही वाचा – “मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”

जया बच्चन यांनी सांगितली होती सेटवरची परिस्थिती

‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी आउटडोअर शूटिंग करताना परिस्थिती कशी असायची ते सांगितलं होतं. शौचालये नसल्यामुळे महिला कलाकारांना आउटडोअर शूटच्या वेळी झाडा-झुडपात जाऊन सॅनिटरी पॅड बदलावे लागायचे. “जेव्हा आम्ही आउटडोअर शूट करायचो तेव्हा आमच्याकडे व्हॅन नव्हत्या. आम्हाला झुडपांच्या मागे सॅनिटरी पॅड बदलावे लागायचे. तेव्हा पुरेशी शौचालयेही नव्हती. सगळीकडे अस्वच्छता असायची,” असं जया बच्चन म्हणाल्या होत्या.

Story img Loader