When Rajkumar Santoshi proposed Meenakshi Seshadri: १९९३ साली प्रदर्शित झालेला ‘दामिनी’ हा बॉलीवूडमधील सर्वोत्तम स्त्री-केंद्रित चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाच्या पडद्यामागची एक वेगळी गोष्टदेखील आहे. यात मुख्य भूमिकेत असलेल्या मीनाक्षी शेषाद्रीला दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी प्रपोज केलं होतं. या चित्रपटाचं शूटिंग करणं खूप कठीण होतं, असं एका मुलाखतीत मीनाक्षीने म्हटलं आहे.

राजकुमार संतोषी यांनी तुला प्रपोज केलं होतं, ही गोष्ट खरी आहे का? असं विचारल्यावर लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत मीनाक्षी म्हणाली, “हो. हे खरं आहे. राजकुमार संतोषी यांनी मला प्रपोज केलं होतं. हा सगळा वाद दामिनी सिनेमाच्या शूटिंगवेळी झाला. त्यांना वाटलं की ते माझ्याबरोबर चित्रपट पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे ते दुसरी अभिनेत्री शोधत होते. पण नंतर कसं तरी आम्ही ते शूटिंग पूर्ण केलं. प्रोड्युसर्स कौन्सिल व आर्टिस्ट्स कौन्सिल यांनी या सगळ्यात हस्तक्षेप करून वाद सोडवला. आम्ही या विषयावर कधीही चर्चा करणार नाही अशी शपथ शूटिंगदरम्यान घेतली होती. जे काही झालं ते भूतकाळ समजून सोडून दिलं. आम्हाला फक्त एक चांगला चित्रपट बनवायचा होता, आम्ही त्यासाठी खूप मेहनत घेतली व चांगलं काम केलं. दिग्दर्शक म्हणून झालेल्या सर्व गोष्टी विसरून त्यांनी चित्रपटासाठी मेहनत घेतली, राजकुमार संतोषी यांना सलाम.”

Video: लग्नानंतर सहा वर्षांनी सेलिब्रिटी कपल होणार आई-बाबा; ‘असं’ पार पडलं डोहाळे जेवण, पाहा व्हिडीओ

राजकुमार संतोषी यांच्याबरोबर काम करणार का?

आता राजकुमार संतोषी यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली तर करणार का, असं विचारल्यावर मीनाक्षीने होकार दिला. “नक्कीच, मी करेन काम. फक्त माझ्यासाठी चांगली भूमिका असायला हवी,” असं मीनाक्षी म्हणाली. याबद्दल तिने पुढे स्पष्टीकरण दिलं, “एवढ्या मोठ्या वादानंतरही दामिनी चित्रपट शूट करताना आम्हाला ऑकवर्ड वाटलं नाही. मग आता इतक्या वर्षांनी तसं काही होईल असं मला वाटत नाही.”

मीनाक्षी शेषाद्री व राजकुमार संतोषी (फोटो – सिनेमातील स्क्रीनशॉट व IMDB)

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत मीनाक्षीने याबाबत सांगितलं होतं. “त्यांनी मला प्रपोज केलं ही बातमी सगळीकडे पसरल्यावर यश चोप्रा व अमजद खान यांनी ‘दामिनी’चं शूटिंग पुन्हा रुळावर आणण्यासाठी हस्तक्षेप केला होता. त्यानंतर राजकुमार संतोषी आणि मी ‘दामिनी’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिला. आम्ही सिनेमा करताना याबाबत काहीच न बोलायचं ठरवलं होतं”, असं मीनाक्षी म्हणाली होती.

लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…”

मीनाक्षीने १९९५ साली हरीश म्हैसूरशी लग्न केलं. तर राजकुमार संतोषी यांनी मनिलाशी लग्न केलं. मीनाक्षीने लग्नानंतर राजकुमार संतोषी यांच्याबरोबर ‘घातक’ चित्रपट केला होता.