Meenakshi Seshadri recalls working with Vinod Khanna: अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री व दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. ‘सत्यमेव जयते’, ‘जुर्म’, ‘पोलीस’, ‘मुजरिम’, ‘क्षत्रिय’ आणि ‘हमशकल’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. यामध्ये दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. मीनाक्षी बऱ्याचदा विनोद खन्ना यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत असते.

विनोद खन्ना खूपच प्रोफेशनल अभिनेते होते. त्यांच्याबरोबर काम करतानाचे अनुभव भन्नाट होते, असं मीनाक्षीने ‘लेहरान रेट्रो’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. “विनोद खन्ना आणि माझं समीकरण खूप चांगलं होते. मी जेव्हा त्यांच्याबरोबर शूटिंग करत असायचे तेव्हा माझ्या वडिलांना सेटवर यायला खूप आवडायचं. जेवणाच्या ब्रेकमध्ये आम्ही अश्लील विनोद करायचो,” असं मीनाक्षी म्हणाली.

Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…

“विनोदजी आणि मी खूप चांगले मित्र होतो, असा माझा दावा नाही. पण ते खूप शांत व दयाळू होते. जेव्हा मी विनोदजींबरोबर शूटिंग करायचे तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या शूटिंगला यायला खूप आवडायचं. आम्ही तिघे अश्लील विनोद करायचो आणि लोकांना वाटायचं की आम्ही का हसतोय. माझं माझ्या वडिलांशी नातं खूप चांगलं होतं. आम्ही तिघेही विनोद करायचो, शब्दांचे खेळ खेळायचो. माझ्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजू इतर कोणालाही दाखवण्यात कम्फर्टेबल नव्हते,” असं मीनाक्षीने नमूद केलं.

Meenakshi Seshadri recalls working with Vinod Khanna
‘जुर्ममधील’ ‘जब कोई बात बिगड जाए’ गाण्यातील एक क्षण (फोटो सौजन्य- व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले…

विनोद खन्ना खूप शांत होते – मीनाक्षी शेषाद्री

विनोद खन्ना खूपच शांत होते, असंही तिने सांगितलं. “ते खूपच शांत व्यक्ती होते. ते त्यांच्या करिअरच्या शिखरावर होते, पण ते आश्रमात जायचे आणि परत येऊन शूटिंग करायचे,” असं मीनाक्षी शेषाद्री म्हणाली. ‘जुर्म’मधील जब कोई बात बिगड जाये’ हे आमचं सुपरहिट गाणं होतं, असंही तिने नमूद केलं.

“थिएटरमध्ये या आणि तुमची लायकी दाखवा,” वरुण धवनच्या वडिलांनी कोणाला दिलं आव्हान? म्हणाले…

ओशो रजनीश यांना ऐकायचे विनोद खन्ना

पूर्वी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत मीनाक्षी म्हणाली होती की, “त्या काळी ते ओशो रजनीश यांच्या टेप्स ऐकायचे. त्यांनी मला ओशो ऐकण्यासाठी प्रोत्साहित केलं, पण ऐकण्यासाठी कधीही जबरदस्ती केली नाही. नंतर त्यांनी कविता दफ्तरी यांच्याशी लग्न केलं. मी त्यांच्या काही पार्ट्यांमध्ये गेले होते.”

Story img Loader