Anant Ambani Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यापैकी काही स्टार्स जे अनंत अंबानीचे जवळचे मित्र आहेत. जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया, वीर पहारिया, मिझान जाफरी, अर्जुन कपूरसह अनेक जण दोघांच्या लग्नाला लाल रंगाचे सारखेच कुर्ते परिधान करून आले होते. अनंतने मित्रांना प्रत्येकी दोन कोटींचे घड्याळ गिफ्ट केल्याच्या चर्चा आहेत. अशातच अनंत व राधिकाची ओळख यापैकीच एका मित्राने केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता कमाल राशीद खान म्हणजेच केआरके याने एक्सवर एक पोस्ट केली होती, त्यात अभिनेता जावेद जाफरींचा मुलगा मिझान जाफरी याने राधिका व अनंतची एकमेकांशी ओळख करून दिली होती, असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर या बदल्यात मिझानला मुकेश अंबानींनी कोट्यवधी रुपयांची भेटवस्तू दिल्याचा दावा केला आहे. त्याच्या या पोस्टवर मिझानचे वडील जावेद जाफरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Video: ख्लोए कार्दशियनला पाहून नेटकऱ्यांना आठवली राखी सावंत, ‘तो’ व्हिडीओ पाहून म्हणाले, “ती चुकीच्या देशात…”

केआरकेची पोस्ट काय?

“अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जावेद जाफरी मुंबईतील वांद्रे भागातील संधू पॅलेसमध्ये राहतो. कारण मुकेश अंबानींनी त्याला ३० कोटी रुपयांचे अपार्टमेंट भेट म्हणून दिले आहे. खरं तर मिझानने राधिका मर्चंटची अनंत अंबानीशी ओळख करून दिली होती. काहीही होऊ शकतं,” अशी पोस्ट केआरकेने केली होती.

केआरकेने केलेली पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

जावेद जाफरी यांची प्रतिक्रिया

केआरकेने केलेली ही पोस्ट व्हायरल झाल्यावर मिझानचे वडील जावेद यांनी फक्त दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केआरकेची पोस्ट रिपोस्ट करत “कुछ भी” (काहीही) असं लिहिलं आहे. तसेच एक हसणारा इमोजी शेअर केला आहे.

त्यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट करून केआरकेची खिल्ली उडवली आहे. तो अजूनही व्हॉट्सअॅप फॉरवर्ड मेसेजेसवर विश्वास ठेवतो. त्याला गांभीर्याने घेऊ नका, असंही काही युजर्सनी म्हटलं आहे, तर अनेकांनी हसणारे इमोजी कमेंट केले आहेत.

Video : अमृता पाठोपाठ पैठणी साडी नेसून ‘या’ मराठी अभिनेत्रीची अंबानींच्या रिसेप्शन पार्टीत एन्ट्री, कोण आहे ती?

अनंत व राधिका बऱ्याच वर्षांपासून एकत्र होते. राधिकाने आकाश अंबानी व इशा अंबानी यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. इतकंच नाही तर ती अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात घरातील सदस्यांप्रमाणे सहभागी व्हायची. दोन वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबानी अनंत व राधिकाचे लग्न ठरवून नातं अधिकृत केलं, त्यानंतर दोन प्री-वेडिंग सोहळेही झाले. अखेर १२ जुलैला त्यांचं शाही थाटात लग्न झालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meezan javed jaffrey introduced radhika merchant to anant ambani mukesh ambani gifted him 30 crore apartment hrc