सुप्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माती मेघना गुलजार सध्या तिच्या आगामी ‘साम बहादूर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विकी कौशल आणि दिग्दर्शक मेघना गुलजार त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. दोघांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’चा विशेष कार्यक्रम ‘एक्स्प्रेस अड्डा’मध्ये हजेरी लावली. यावेळी मेघनाने ‘छपाक’ फ्लॉप झाला त्यावरही भाष्य केलं.

मेघना गुलजारने दीपिका पदुकोण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्यानंतर झालेल्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाच्या जेएनयू भेटीचा परिणाम तिच्या ‘छपाक’ या चित्रपटावर झाल्याचे मेघना गुलजारने मान्य केले आहे. मेघना म्हणाली, “माझे उत्तर खूप स्पष्ट आहे. होय, अर्थातच दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीचा चित्रपटावर परिणाम झाला. कारण विषय अॅसिड हल्ल्यावरून हिंसाचारापर्यंत पोहोचला. चर्चा कुठल्या कुठे पोहोचली, त्यामुळे साहजिकच त्याचा चित्रपटावर परिणाम झाला. यात शंका नाही.”

Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
Priyadarshini Indalkar
“त्या स्कीटनंतर इतकं हसं झालं”, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील किस्सा; म्हणाली…
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
Naga Chaitanya & Sobhita Dhulipala Wedding Nagarjuna Shares Photos
नागा चैतन्य-सोभिता धुलिपाला अडकले विवाहबंधनात! नागार्जुन यांनी सूनबाईसाठी लिहिली खास पोस्ट
Narendra Modi Watched The Sabarmati Report Movie
The Sabarmati Report : ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चित्रपट निर्मात्यांनी…”

“मी चित्रपट दोनदा पाहिला आणि…”, ‘सॅम बहादुर’बद्दल सॅम माणेकशा यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “जेव्हा विकी…”

दीपिका पदुकोण आणि जेएनयू वाद नेमका काय?

२०२० मध्ये दीपिका पदुकोण तिच्या ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीत आली होती. तेव्हा तिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला (जेएनयू) भेट दिली. त्यावेळी जेएनयूमधील विद्यार्थी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करत होते. त्या विद्यार्थ्यांबरोबर दीपिका उभी राहिली होती, तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या जेएनयू भेटीवर जोरदार टीका झाली होती. त्याचा परिणाम तिच्या ‘छपाक’ चित्रपटाच्या कमाईवरही झाला होता.

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी

लक्ष्मी अग्रवालचा बायोपिक ‘छपाक’

५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ५५.४४ कोटींची कमाई केली होती. ‘छपाक’ चे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले होते. या चित्रपटात दीपिकाबरोबर विक्रांत मेस्सी होता. ‘छपाक’ हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालचा बायोपिक होता. लक्ष्मीवर २००५ मध्ये नईम खान उर्फ ​​गुड्डू नावाच्या तरुणाने दिल्लीच्या खान मार्केटमध्ये अॅसिड फेकले होते.

Story img Loader