प्रसिद्ध गायक मिका सिंग गेली अनेक वर्ष आपल्या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावत आला आहे. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून मिका सिंग आजारी असल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या या आजारपणामुळे त्याचं प्रचंड आर्थिक नुकसानही झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेले काही दिवस मिका देश-विदेशात म्युझिक टूर करत होता आणि त्यामुळेच आता आपली तब्येत खालावल्याचं मिकाने कबूल केलं आहे. आजवरच्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीत प्रथमच मिकाला त्याचा कार्यक्रम रद्द करावा लागल्याचंही त्याने सांगितलं आहे. घशाला इन्फेक्शन झाल्याने मिका सध्या परदेशातच आहे आणि यामुळेच त्याला त्याचा शोदेखील रद्द करावा लागला आहे.

आणखी वाचा : ‘G-20 समिट’चा शाहरुख खानच्या ‘जवान’ला बसणार फटका; दिल्लीतील चित्रपटगृहं राहणार बंद?

इतकंच नव्हे तर तब्बल १५ कोटींचे नुकसानही मिकाला झाले असल्याचे त्याने सांगितले आहे. आपल्या शरीराला अजिबात आराम न दिल्याने ही वेळ आज त्याच्यावर आली असल्याचं त्याने सांगितलं आहे. अमेरिकेतील डल्लास या शहरात कार्यक्रमादरम्यान मिकाचं डोकं दुखायला लागलं अन् त्याच्या घशालाही त्रास व्हायला लागला. यानंतर जेव्हा तो डॉक्टरकडे गेला तेव्हा अमेरिका ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास करून तिथे जाऊन गाण्यासाठी डॉक्टरांनी नकार दिला.

त्यामुळे सध्या मिका हा अमेरिकेतच उपचार घेत आहे. या शो अचानक रद्द केल्याने १० ते १५ कोटींचं नुकसानही त्याला झेलावं लागलं आहे. आता त्याच्या तब्येतील सुधारणा होत आहे आणि लवकरच मिका पुन्हा लाईव्ह शोसाठी एकदम फिट होईल असं सांगितलं जात आहे. मिकाचे पुढील लाईव्ह शोज बाली, सिंगापूर, मलेशिया या देशांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.