गायक मिका सिंग हा सुपरस्टार सलमान खानचा खूप चांगला मित्र आहे. आता एका मुलाखतीत मिकाने सलमानबद्दलचा एक विनोदी किस्सा सांगितला. सलमानने एकदा रात्री उशिरा मिकाला फोन केला आणि म्हटलं की तो त्याचं सिनेमातील गाणं बदलू शकतो. इतकंच नाही तर तो फोनवर गाणंही गाऊ लागला. तसेच एका गाण्यात कतरिना कैफचा संदर्भ होता, पण सलमान खानच्या विनंतीनंतर ते बदललं, असा खुलासा मिकाने केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत मिकाने सांगितलं की तो सलमानचा खूप आदर करतो. दोघेही ९० च्या दशकात पहिल्यांदा भेटले होते. “तो माझ्या एका शूटसाठी आला होता. आम्ही बोललो पण मी त्याच्याशी गोडगोड बोलून त्याचा फोन नंबर मागितला नाही. त्यावेळी जर मी जर तेवढा स्मार्ट असतो तर कदाचित तसं केलं असतं,” असं मिका म्हणाला. त्यानंतर एका दशकानंतर हिमेश रेशमियाने मिकाला ‘बॉडीगार्ड’ चित्रपटातील गाण्यासाठी बोलावलं, तेव्हा त्यांची पुन्हा भेट झाली.

हेही वाचा – “तुमच्या गलिच्छ राजकारणात…”, अमेय खोपकरांची प्राजक्ता माळीचं नाव घेणाऱ्या सुरेश धस यांच्यावर टीका; म्हणाले, “हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे…”

सलमानचा फोन उचलला नाही तर…

मिका पुढे म्हणाला, “मी त्याच्यासाठी ‘जुम्मे की रात’ हे गाणं आधीच गायलं होतं. पण मला वाटतं की त्यात माझा आवाज भयंकर होता. मात्र सलमान भाईला ते खूप गाणं खूप आवडलं होतं. त्यामुळे त्याच्याशी असहमत व्हायचा प्रश्नच येत नाही. सलमानला मध्यरात्री २ वाजता फोनवर बोलायला आवडतं आणि जर तुम्ही त्यांचा फोन उचलला नाही तर तो खूप नाराज होतो.”

हेही वाचा – अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”

मिका बालीमध्ये होता आणि त्याला सलमानचा फोन आला. सलमानने ‘जुम्मे की रात’ गाणं गायलं आणि ते ‘किक’ सिनेमात असावं असं त्याला वाटत होतं. मिका म्हणाला, “जिथे मी रिप्लेस होऊ शकतो, असे काम मी कधीच घेत नाही. पण इथे मला खुद्द सलमान खान रिप्लेस करणार होता. त्यामुळे मी काय करणार होतो? मी खूप टेन्शनमध्ये होतो. मग त्याने मला विचारलं की मला त्याचं गाणं आवडलं का, मी हो म्हणालो. पण त्याचा एक पुतण्या त्याच्याबरोबर होता, त्यानेही गाणं ऐकलं, मग तो म्हणाला की मी गायलेलं जास्त चांगलं आहे.”

हेही वाचा – जगभर गाजलेला All We Imagine As Light ओटीटीवर रिलीज होणार; कधी, कुठे पाहता येणार सिनेमा? वाचा

मिकाने सांगितलं की तो बरेचदा सलमान आणि त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटमधील त्याच्या घरी जातो. तुम्हाला जर सलमानच्या घरी बिर्याणी खायची असेल तर त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागते, तसेच सलमानचं गाणं ऐकावं लागतं, असं मिकाने सांगितलं. सलमानबरोबरचं नातं जपायला कधी त्याने गाण्यातील एखादा शब्द बदलला आहे का? असं मिकाला विचारण्यात आलं. त्यावर मिका म्हणाला, “मी ‘कतरिना’ हा शब्द बदलून ‘जॅकलिना’ केला आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mika singh says he removed katrina kaif name from song after salman khan request hrc