अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मागच्या काही काळापासून तिचे चित्रपट व अभिनयापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरबरोबर असलेल्या नात्यामुळे ती अडचणीत सापडली. त्यानंतर तिला अनेकवेळा चौकशीला सामोरं जावं लागलं. नुकतीच जॅकलिनने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात ती हॉलिवूड अभिनेता जीन-क्लॉड व्हॅन डॅमेबरोबर दिसत होती. तिच्या या फोटोवरून गायक मिका सिंगने तिला टोला लगावला आहे.
“विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”
मिकाने जॅकलिनचा जीन-क्लॉड व्हॅन डॅमेसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिलं, “तू खूप सुंदर दिसत आहेस. हा सुकेशपेक्षा खूपच चांगला आहे.” मिकाने नंतर मात्र ही पोस्ट डिलीट केली, पण त्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिकाने जॅकलिनवर टीका करणारी कमेंट केली, तर दुसरीकडे रोहित शेट्टी व वरूण धवनने मात्र तिचं कौतुक केलं.
दरम्यान, सुकेश चंद्रशेखर २०० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात सध्या दिल्लीतील तुरुंगात आहे. तपासादरम्यान सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर जॅकलिन फर्नांडिस अडचणीत आली होती. तिचे सुकेशबरोबरचे काही रोमँटिक फोटोही व्हायरल झाले होते. सुकेश बऱ्याचदा जॅकलिनला तुरुंगात पत्रंही लिहित असतो. त्याने जॅकलिनच्या वाढदिवसाला आणि होळीनिमित्त लिहिलेली पत्रे चांगलीच व्हायरल झाली होती.