बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चे असते. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते. जान्हवीने जास्त चित्रपट केले नसले तरी तिच्या परीने उत्तम काम करायचा प्रयत्न करत असते. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी म्हणून जरी लोकं तिला ओळखत असले तरी ती कायम स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करत असते. आईबद्दल ती कायमच भावूक होत असते.

सध्या जान्हवी कपूर मिली चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान एका कार्यक्रमात ती असं म्हणाली की “माझ्या आईच्या कोणत्याच चित्रपटाचा रिमेक कोणीही केला नाही पाहिजे. तिच्याइतकं काम कोणीच करू शकत नाही”. सध्या अनेक दाक्षिणात्य आणि जुन्या हिंदी चित्रपटांचे रिमेक बनत आहेत. बॉलिवूडमध्ये सध्या रिमेक चित्रपटांची लाट आली आहे.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”

अभिषेक बच्चनला आवडतो ऐश्वर्याचा ‘हा’ गुण; म्हणाला “तिने मला…”

जान्हवीने मागेदेखील एका मुलाखतीत सांगितले होते “माझ्या आईसारखी लोकप्रियता कोणालाच मिळणार नाही. ती जेव्हा चित्रपटात काम करत होती तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, तीने चित्रपटातून ब्रेक घेतल्यानंतर माझा जन्म झाला. पण तिच्याबरोबर काम केलेली लोकं आज जेव्हा तितक्याच आत्मीयतेने बोलतात तेव्हा मला तिच्या कामाची, तिच्या योगदानाची जाणीव होते. ही गोष्ट खूप दुर्मिळ आहे, ती पुन्हा घडणार नाही.”

जान्हवी ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची पहिली मुलगी. कित्येक वर्षं चित्रपटात काम केल्यानंतर १९९७ मधील ‘जुदाई’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी चित्रपटात काम करणं कमी केलं. नंतर जान्हवीचा जन्म झाला आणि थेट २०१२ साली श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश वींग्लिश’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केलं.