बॉलिवूड स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. दिवाळी पार्टी असो किंवा हॅलोवीन पार्टी, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चे असते. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते.दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी म्हणून जरी लोकं तिला ओळखत असले तरी ती कायम स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करत असते. आगामी मिली चित्रपटाच्या निमित्ताने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना तिच्यावर होण्यात टीकेवर आणि इतर विषयांवर तिने भाष्य केले आहे.

श्रीदेवी, स्टार किड्स, टीका यावर बोलताना जान्हवी असं म्हणाली की “माझ्यावर ज्या पद्धतीने टीका होते त्यातून मी निराश होत नाही प्रत्येकजण त्यांचे काम करत असतात”. तिने कोणतेही वक्तव्य केले किंवा नाही केले तरी ती चर्चेत असते यावर ती असं म्हणाली की “या गोष्टी कधीच जुन्या होत नाही. मी कधी कधी बातम्यांमुळे चकित होते. मला आश्चर्य वाटत की तुमचा एखाद्याशी झालेला चांगला संवाद एखादा त्याची बातमी करून जातो त्याला ती संधी वाटते. बऱ्याचदा वाईट लूकमुळेदेखील तुमच्यावर बातम्या, चर्चा केल्या जातात. माझ्याबद्दल अनेकवेळा चुकीच्या बातम्यादेखील लिहल्या गेल्या आहेत. पण मी आता ठरवले आहे निराश व्हायचे नाही. असा एक टप्पा होता जिथे मला वाटत होते साध्या संवादातून आपण फसवले जात आहोत. दुर्दैवाने या व्यवसायात लोकांना नकारात्मक राहण्यासाठी आणि नकारात्मक मथळे टाकल्याबद्दल बरेच दिवस पुरस्कृत केले गेले आहे, म्हणून त्यांना वाटते की तेच विकले जाते.”

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

Photos : फक्त अक्षय कुमारच नाही, तर बिग बींसह ‘या’ कलाकारांनीही केलंय मराठी चित्रपटांमध्ये काम

तिच्यावर होणाऱ्या टीकेवरून ती असं म्हणाली, “तुम्ही काही करा लोक तुमच्यावर टीका करणार. मला असे वाटते की मी या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी काय करू शकते तर मी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करते. तसेच मी स्वतः कोण आहे याची जबाबदारी घेऊ शकते. जर मी एखादे सत्य सांगितल्यावर जर टीका होत असेल तर माझ्याकडे सांगण्यासारखे ती एकमेव गोष्ट असेल.”

सध्या जान्हवी कपूर ‘मिली’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.मिली’ हा २०१९मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट ‘हेलन’चा रिमेक आहे. ‘मिली’चं दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी केलं आहे. बोनी कपूर यांनी झी स्टुडिओजच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे

Story img Loader