स्वतःच असं एक घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सामान्य माणसांप्रमाणे सेलिब्रेटी मंडळीदेखील घर घेत असतात. नुकतंच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मुंबईत घर घेतले आहे. त्यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिच्या कुटुंबाने मुंबईत आलिशान घर घेतले आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी म्हणून जरी लोकं तिला ओळखत असले तरी ती कायम स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करत असते. नुकताच तिचा ‘मिली’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

जान्हवी कपूरने तिची धाकटी बहीण खुशी आणि वडील बोनी कपूर यांच्याबरोबरीने मुंबईच्या वांद्रे उपनगरातील पाली हिल परिसरात ६५ कोटी रुपयांना एक आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ६,४२१ चौरस फूट इतके चटईक्षेत्र आहे. indexapt च्या माहितीनुसार या व्यवहाराकरता कुटुंबीयांनी ३.९० कोटी मुद्रांक शुल्क भरले आहे. हा व्यवहार १२ ऑक्टोबर २०२२ रोजी झाला आहे. या अपार्टमेंटमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर बगीचा स्विमिंग पूल असा सुविधा असणार आहेत.यामध्ये पार्किंगसाठी पाच स्लॉटदेण्यात आले आहेत. त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण होणार नाही.

वांद्रे येथील पाली हिल भागात अनेक सेलिब्रेटी तसेच व्यावसायिक राहतात. शाहरुख खान, आमिर खान सलमान खान हे तिन्ही खान वांद्रे परिसरात राहतात. जान्हवी प्रमाणेच अभिनेता रणवीर सिंगनेदेखील वांद्रे परिसरात ११९ कोटींचे घर विकत घेतले आहे.

Story img Loader