दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. त्यांनी आपले करियर दाक्षिणात्य चित्रपटांमधून सुरु केले. त्यानंतर ऐंशी नव्व्दच्या दशकात त्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री बनल्या. ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात त्यांनी अभिनेता अनिल कपूर यांच्याबरोबर काम केले. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
या दोघांनी एकत्र काम केलेला चित्रपट म्हणजे ‘जुदाई’ मात्र या चित्रपटात उर्मिला मातोंडकरदेखील होती. बोनी कपूर यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती. बोनी कपूर यांनी नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “लोकांनी मला सांगितले हा चित्रपट चालणार नाही कारण माझं लग्न श्रीदेवीबरोबर झालं होत आणि चित्रपटात श्रीदेवी माझ्या भावाबरोबर ( अनिल कपूर) काम करणार होती.” तसेच ते पुढे म्हणाले अनिल कपूरलादेखील लोक सांगत होते की त्याने ‘मिस्टर इंडिया’ चित्रपट करू नये.
जान्हवी कपूरने खरेदी केलं मुंबईत घर, किंमत ऐकून थक्क व्हाल
‘जुदाई’ चित्रपट १९९७ रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट एका तेलगू चित्रपटाचा रिमेक होता. दिग्दर्शक राज कनवार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात फरीदा जलाल, जॉनी लिव्हर, उपासना सिंग आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.
बोनी कपूर यांचा नवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांची मुलगी जानव्ही कपूर काम करत आहे. या चित्रपटाचे नाव ‘मिली’ आहे. हा एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.