अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण हा त्याच्या फिटनेसमुळे चांगलाच ओळखला जातो. वयाच्या ५७ व्या वर्षीही तो त्याच्या फिटनेसमुळे तरुण कलाकारांना टफ फाईट देताना दिसतो. मिलिंद सोमानाच्या फिटनेसचं रहस्य काय हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. पण आता नुकतंच त्याचे फोटो काढण्यासाठी आलेल्या पापराझींकडून याचं प्रात्यक्षिक करून घेतलं आहे.
मिलिंद सोमणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तो एका ठिकाणी गेला असता तिथे मीडिया फोटोग्राफर्स आले आणि त्याला फोटो देण्याचे विनंती केली. परंतु स्वतःचे फोटो देण्याच्या बदल्यात त्याने त्या फोटोग्राफर्सकडून मोठेच कष्ट करून घेतले.
आणखी वाचा : बॉलिवूड चित्रपटांच्या आपयशमुळे जान्हवी कपूरने घेतला करिअरबाबत ‘हा’ मोठा निर्णय
मिलिंदने त्या फोटोग्राफर्सना फोटो देण्याच्या बदल्यात २०-२० पुशअप्स मारायला सांगितल्या. त्यानुसार हे फोटोग्राफर्स पुश-अप्स मारताना व्हिडीओत दिसत आहेत. ते सर्वजण २० पुशअप्स मारतात की नाही याचं निरीक्षण स्वतः मिलिंद करत आहे. तो त्यांच्यासमोर उभे राहून त्यांनी किती पुशअप्स मारले हे मोजत आहे. त्यामुळे मिलिंदचे फोटो घेण्याच्या बदल्यात त्यांना फारच घाम गाळावा लागला आहे.
हेही वाचा : “ही कला आहे की अश्लीलता…” ‘पठाण’च्या वादावर भाष्य करताना मिलिंद सोमणला आठवलं त्याचं न्यूड फोटोशूट
त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलीच मजा घेत असून या व्हिडीओवर कमेंट करत त्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.