अभिनेत्री व टीव्ही होस्ट मिनी माथूरने २५ वर्षांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक कबीर खानशी आंतरधर्मीय विवाह केला होता. अलीकडेच कबीर खानने त्यांच्या आत्मधर्मीय विवाहाबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर कबीरशी लग्न केल्यावर आपण त्याचं आडनाव खान का लावलं नाही, याबद्दल मिनीने खुलासा केला आहे. तिने ‘सायरस ब्रोचा’ यांच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती, यावेळी तिने तिच्या लग्नाबद्दल आणि कबीरचं आडनाव न लावण्यामागचं कारण सांगितलं.
मुस्लीम असल्याने सासरच्या मंडळींनी बदललेलं शाहरुख खानचं नाव; खुद्द गौरीने केलेला खुलासा
मिनीने आडनाव न बदलल्यामुळे तिला बऱ्याचदा टीकेला सामोरं जावं लागतं. पण, हा तिचा वैयक्तिक निर्णय होता. तिला मिनी माथूर नावाने ओळखलं जातं, त्यामुळे तिने आडनाव बदललं नाही. तसेच यामागचं तार्किक कारण देत ती म्हणते की कबीरला असं वाटलं की तिने आडनाव बदलल्यास तिला तिची सर्व अधिकृत कागदपत्रे बदलून घ्यावी लागतील. नाव बदलण्याची कागदोपत्री पक्रिया किचकट असते, त्यामुळे कबीरने तिला खान आडनाव न बदलण्याचा सल्ला दिला.
सासूने रेखा यांना मारायला उगारलेली चप्पल; अवघ्या दोन महिन्यात मोडलेलं प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न
मिनी म्हणाली, “माझ्यासाठी ते खूप सोपं होतं. कबीर खानशी लग्न करण्याआधी माझी ओळख मिनी माथुर अशी होती, त्यामुळे मला त्याच्या नावाचा आधार का हवा होता हे समजत नाही. शिवाय, मी आडनाव बदलू नये, हे त्यानेच मला सांगतलेलं. तो म्हणाला, ‘आडनाव बदलल्यावर बँक, पासपोर्ट या सगळ्या ठिकाणी नाव बदलावं लागेल आणि ही प्रक्रिया खूप किचकट असते.’ मला कबीरने कधीच माझे नाव किंवा आडनाव बदलायला सांगितले नाही आणि मला माझे नाव बदलायचे नव्हते. त्यामुळे आम्ही याबद्दल कधीच चर्चाही केली नाही.”
महिलांनी लग्नानंतरही त्यांचं मूळ नाव कायम ठेवलं पाहिजे, असं मिनीला वाटतं. पण बऱ्याचदा यामुळे त्यांना अडचणी येऊ शकतात असंही ती मान्य करते. “जेव्हा तुम्ही पासपोर्ट ऑफिसमध्ये जाता, विशेषत: महाराष्ट्र सरकारमध्ये, ते तुम्हाला तुमचं नाव मिनी सुरेश माथूर असायला हवं किंवा मिनी कबीर खान असायला हवं, असा सल्ला देतात. कारण मध्यभागी तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या नावाशिवाय तुमची ओळख नाही. पण मी त्यासाठीही लढले, मी कुठेच पतीचे किंवा वडिलांचे नाव लावत नाही. शाळेच्या फॉर्ममध्येही त्यांचं नाव न लावण्यासाठी मी भांडले. शाळेच्या फॉर्ममध्ये खरंच धर्माचा कॉलम गरजेचा आहे का? माझ्यासाठी खरंच पती किंवा वडिलांचं नाव इतकं गरजेचं आहे का? मला वाटेल ते नाव मी लावेन,” असं मिनी म्हणाली.