शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलीवूडचं लोकप्रिय कपल आहे. शाहिद आणि मीराने २०१५ रोजी लग्नगाठ बांधली. दोघांना मीशा आणि जैन अशी दोन मुलं आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीराचं प्रोफेशन वेगळं असल्याने शाहिदबरोबर लग्न केल्यानंतर तिला सततच्या लाईमलाईटची, स्पॉटलाईटची सवय नव्हती. एकदा मीराने एका कार्यक्रमामध्ये बेबीज आणि पपीज (श्वान) यांची तुलना केली होती. मीरा म्हणाली होती की, तिची मुलगी काही पपी (श्वान) नाही. या वक्तव्यामुळे मीरा खूप ट्रोल झाली होती. आता मीराने या वक्तव्यावर खेद व्यक्त करत स्वत:ची बाजू मांडली आहे.

हेही वाचा… दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, अभिनेत्रीच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

फिल्म कंपॅनियनला दिलेल्या मुलाखतीत मीरा म्हणाली की, “मला वाटतं की मी कदाचित ती गोष्ट ओघात बोलून गेले असेन, पण मला वाटत नाही की मी आत्ता त्या गोष्टीशी सहमत आहे. मी समजू शकते की, लोकांनी यावर अशी प्रतिक्रिया का दिली. मला वाटतं की, तेव्हा मी भावनेच्या भरात बोलून गेले असेन. मला वाटतं की मी फक्त माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते की माझ्या निवडीदेखील वैध आहेत. मला त्या वक्तव्याबद्दल आता खेद वाटतोय आणि मला माहीत आहे की, बरेच लोक यामुळे दुखावले गेले आहेत.”

खरं तर मीरा तिच्या त्या वक्तव्याला आयुष्यातील एक “टर्निंग पॉईंट” मानते, ज्याने प्रसिद्धीझोतात (spotlight) राहिल्यानंतर आपल्या वक्तव्याने लोकांना किती फरक पडू शकतो हे तिला कळलं.

हेही वाचा… “मराठी चित्रपटाची तुलना…”, सिद्धार्थ जाधवचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला…

मीराने सांगितलं की, अजूनही तिला यावरून हेट कमेंट्स येतात. तथापि, त्यावेळी पती शाहिदने तिला पाठिंबा दिल्याबद्दल ती कृतज्ञ आहे. मीरा म्हणाली की, “मला वाटतं की त्याबद्दल आता मला माफ करण्याची वेळ आली आहे, कारण जीवन एक वर्तुळ असतं आणि आपण चुका करतो आणि त्याच चुकांमधून आपण शिकतो.”

२०१७ मध्ये मीराने केलेलं वक्तव्य

२०१७ मध्ये मीराने महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. जिथे ती म्हणाली की, तुम्हाला माहितीय का, मी माझ्या मुलीला उत्तम प्रकारे वाढवू शकते. मी चांगली पत्नी बनू शकते. मी माझं घर माझ्या पद्धतीने लावू शकते. कोणीही मला हे करण्यापासून थांबवू शकत नाही. मला घरी राहायला आवडतं. मला माझ्या मुलांची आई व्हायला खूप आवडतं.

मला माझ्या मुलाबरोबर दिवसातला फक्त एक तास घालवायचा नाही आणि घाईघाईने कामावर जायचं नाही, मग मी तिला जन्मच का दिला असं होईल. ती काही (पपी) श्वान नाही आहे. एक आई म्हणून मला तिच्यासाठी तिथं राहायचं आहे, तिला मोठं झालेलं पाहायचं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira rajput gets hate comments on 2017 statement which she is regretting now dvr