अनेक आघाडीच्या बॉलीवूड अभिनेत्यांनी आपल्या करिअरमध्ये कधी ना कधी फ्लॉप चित्रपट दिलेच आहेत. यात अगदी सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सनी देओल, अजय देवगण, अक्षय कुमारसारख्या अनेक अभिनेत्यांचा समावेश आहे. पण बॉलीवूडच्या एका अभिनेत्याने थोडेथोडके नाही तर तब्बल १८० फ्लॉप चित्रपट त्याच्या पूर्ण करिअरमध्ये दिले. या अभिनेत्याने करिअरमध्ये जेवढे चित्रपट केलेत, त्यातील निम्म्यापेक्षा जास्त चित्रपट फ्लॉप झाले पण तरीही प्रचंड लोकप्रियता मिळवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिथून चक्रवर्तींनी १९८९ साली रचला होता ‘हा’ विक्रम; ३३ वर्षांनंतर अजूनही अबाधित

करिअरमध्ये सर्वाधित फ्लॉप चित्रपट देणाऱ्या ज्या अभिनेत्याबद्दल आम्ही बोलत आहोत ते आहेत मिथुन चक्रवर्ती. हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत सर्वाधिक फ्लॉप चित्रपटांमध्ये काम करण्याचा नकोसा रेकॉर्ड मिथुन यांच्या नावावर आहे. मिथुनदा ८० व ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक होते. ते दरवर्षी एक डझनपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करायचे. १९८९ साली तर वर्षभरात त्यांनी तब्बल १९ चित्रपट केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत २७० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला, त्यापैकी १८० चित्रपट फ्लॉप आहेत. या यादीत त्यांच्यानंतर जितेंद्र यांचा नंबर लागतो. जितेंद्र यांच्या नावावर १०१ फ्लॉप चित्रपट आहेत.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं बॉलीवूड पदार्पण, जान्हवी अन् साराशी कनेक्शन असलेला वीर आहे तरी कोण?

९० च्या दशकाच्या उत्तरार्धात एक वेळ अशी आली होती की मिथुन यांनी सलग ३३ फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले होते. करिअरमध्ये निम्म्याहून अधिक फ्लॉप सिनेमे देऊनही मिथुन यांच्या करिअरवर त्याचा नकारात्मक परिणाम कसा झाला नाही, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याचं कारण म्हणजे त्यांनी अनेक हिट सिनेमेही दिले. त्यांनी ५० हिट चित्रपट दिले, ज्यामध्ये ३ ब्लॉकबस्टर आणि ९ सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. या ५० हिट चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांचे इतर सात चित्रपट सरासरीपेक्षा जास्त कमाई करणारे होते. खरं तर, मिथुन यांचे बहुतेक फ्लॉप चित्रपट कमी बजेटचे होते. त्यांनी त्यांचे नुकसान जवळजवळ भरून काढले होते. यासंदर्भात ‘डीएनए’ने वृत्त दिलंय.

रणबीर कपूर आरोपी नाही, तर…; ईडीने अभिनेत्याला समन्स बजावल्याचं कारण समोर

बंगाली कुटुंबात जन्मलेले मिथुन चक्रवर्ती चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी नक्षली होते, पण त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर ते कुटुंबाजवळ परतले. त्यांनी ‘मृगया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर अनेक सुपरहिट चित्रपट केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithun chakraborty has done 180 flop films in his career hrc
Show comments