मिथून चक्रवर्ती बॉलीवूडमधील सुपरस्टार आहेत. ‘गरिबांचा अमिताभ बच्चन’ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. बॉलिवूडमधला ८० ते ९० हा काळात मिथून यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, आपल्या आयुष्यात मिथून चक्रवर्ती यांना अनेक कठिण प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. नुकतच एका कार्यक्रमात मिथून यांनी त्यांच्या ब्रेकअपबाबतचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- ‘आस्क एसआरके’ सेशनमध्ये चाहत्यांना कोण उत्तर देतं? शाहरुख खानने केलं स्पष्ट, म्हणाला…
मिथून चक्रवर्ती म्हणाले, ‘आयुष्यात प्रत्येकजण कठीण प्रसंगातून जातो. मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की प्रेम करणे आणि प्रेमात असणे ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु प्रेमात आंधळे होणे योग्य नाही. मी माझ्या आयुष्यात अशाच प्रसंगातून गेलो आहे. ती मला सोडून गेली तेव्हा मी प्रेमात पडलो होतो. पण त्या प्रसंगाने माझे आयुष्य बदलून टाकले. मी एका सामान्य अभिनेत्यामधून सुपरस्टार बनलो.”
मिथुन चक्रवर्ती पुढे म्हणाले, “योगायोगाने एकदा ती मला रेल्वेमध्ये दिसली. मला पाहताच ती लपली. मी तिच्याकडे गेलो आणि तिला म्हणालो की तिने मला सोडून योग्य केलं. माझ्याकडे देण्यासारखे काहीही नव्हते. माझं भविष्य नव्हते. माझ्याकडे घर नव्हते माझ्या खाण्याचीही भ्रांत होती. मी तिला असे सांगून धीर दिला की मी आज जो काही आहे त्यामागे तू घेतलेल्या निर्णयाचा मोठा हात आहे. माझा विश्वास आहे की आयुष्याचे चक्र पूर्ण जेव्हा ती पुन्हा भेटेल तेव्हा सगळे वाद संपलेले असतील”
हेही वाचा- मृणाल ठाकूर तेलगू अभिनेत्याबरोबर बांधणार लग्नगाठ? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली…
मिथुन चक्रवर्ती यांनी दोन लग्न केले तर त्यांचे तीन अफेअर होते. मिथुन यांचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले. मिथुन चक्रवर्ती यांनी पहिले लग्न हेलेना ल्यूकशी १९७९ मध्ये केले होते. पण हे लग्न केवळ चार महिनेच टिकले आणि त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर मिथुन यांनी त्याच वर्षी अभिनेत्री योगिता बालीसोबत लग्नगाठ बांधली. योगिता आणि मिथुन यांना तीन मुल आहेत तर त्यांनी दिशानी नावाच्या मुलीला दत्तक घेतलं आहे. मिथुन यांच नाव श्रीदेवी यांच्याशीही जोडलं गेलं होतं. दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्याची चर्चा ऐकायला मिळतात.
मिथुन चक्रवर्ती यांचे नाव कमल हसन यांची पुर्वश्रमीची पत्नी सारिकाबरोबरही जोडले गेले होते. मिथुन आणि सारिका यांनी १९७८ मध्ये ‘हमारा संसार’ चित्रपटात काम केले होते. त्यादरम्यान त्यांच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. नंतर सारिका आणि मिथुन आणखी काही चित्रपटात एकत्र दिसले होते.