गेल्या दोन चार वर्षांपासून बॉलिवूडमध्ये घराणेशाही (नेपोटीजम)बद्दल झालेल्या बऱ्याच चर्चा आपल्या कानावर पडल्या असतील. यावर सर्वच स्तरातून भाष्य होत असतं. अगदी आजच्या काळातील नेपोकिडसवर तर लोक सडकून टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात. पण सगळ्याच बड्या स्टार्सच्या मुलांच्या नशिबात स्टार होणं नसतं. काही कलाकारांची मुलं ही पुरेसं पाठबळ, आई-बापाची पुण्याई व चांगल्या ओळखी असूनही मागे पडतात त्यापैकी एक नाव म्हणजे नमाशी चक्रवर्ती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नमाशी चक्रवर्ती हा मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा. स्टारकीड जरी असला तरी समोरच्या व्यक्तीमध्ये कुवत असणं हेदेखील तितकंच आवश्यक असतं. नमाशीच्यामागेही मिथुन चक्रवर्ती सारख्या दिग्गज कलाकाराचं नाव जोडलेलं आहे तरी प्रेक्षकांनी त्याला साफ नाकारलं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये या क्षेत्रात कराव्या लागणाऱ्या संघर्षाबद्दल, घराणेशाहीबद्दल, पापाराझी कल्चरबद्दल भाष्य केलं आहे. याविषयी बोलताना नमाशीने सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या ओरीवरही भाष्य केलं आहे.

पापाराझी कल्चरपासून नमाशी का दूर आहे, त्यांच्याबरोबर फोटो काढणं त्याला का पसंत नाही याविषयी नमाशीने ‘बॉलिवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. तो म्हणाला, “जवळजवळ महिनाभर मी ते कल्चर फॉलो करायचा प्रयत्न केला. मी भाड्यावर काही कपडे आणायचो अन् ते परिधान करून पोझिंगसाठी तयार राहायचो. कालांतराने मी ते करणं बंद केलं. नुकताच मी सोहो हाऊसमध्ये गेलो होतो, तिथे भेटलेल्या माझ्या एका मित्राने मी नेमकं काय करतो याबद्दल विचारलं. त्याला मी सांगितलं की मी अभिनेता आहे. तो भलताच खुश झाला अन् त्याने माझं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं अन् त्याने मला विचारलं की तुझी ओरीशी मैत्री आहे का?”

आणखी वाचा : सुश्मिता सेनने सांगितली ‘मै हूं ना’बद्दलची ‘ती’ आठवण; जेव्हा फराह खानने दिलेलं अभिनेत्रीला मोठं सरप्राइज

हा प्रश्न नमाशीला चांगलाच खटकला. त्याबद्दल बोलताना नमाशी म्हणाला, “मी इतकी वर्षं स्वतःला सिद्ध करण्यासाठी जी मेहनत घेत आहे, मी एका मोठ्या सुपरस्टारचा मुलगा आहे याचं कुणालाच सोयर सूतक नाही पण सोशल मीडियावर पाउट करून सेलिब्रिटीजबरोबर सेल्फी घेणाऱ्या या माणसाला मात्र सगळे ओळखतात. ही बाब माझ्यासाठी चिंताजनक आहे. मलादेखील ओरीसारखं फेमस व्हायचंय. विनोद राहीला बाजूला पण अगदी खरं सांगायचं झालं तर अशा प्रकारची लोकप्रियता मला नको.”

नमाशी चक्रवर्तीने राजकुमार संतोषी यांच्या ‘बॅड बॉय’ या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. परंतु कोविड आणि लॉकडाउनमुळे हा चित्रपट लोकांसमोर यायला बराच वेळ लागला अन् बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला.