मिथुन चक्रवर्ती यांनी ८० च्या दशकात सिनेसृष्टीवर राज्य केलं. त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला दिले. ते अजूनही हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. या इंडस्ट्रीत नेपोटिझम म्हणजेच घराणेशाहीबद्दल खूप बोललं जातं, स्टारकिड्सना खूप संधी मिळतात, असं म्हटलं जातं. पण, मिथुन चक्रवर्तींची मुलं असूनही मिमोह आणि नमाशी अभिनयक्षेत्रात कमाल दाखवू शकले नाहीत. मिथुन यांचा धाकटा मुलगा नमाशीने अलीकडेच ‘बॅड बॉय’मधून पदार्पण केलं. नमाशीने मोठा भाऊ मिमोह अभिषेक बच्चनइतक्या संधी मिळाल्या असत्या तर यशस्वी होऊ शकला असता, असं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लेहरेन रेट्रो’ ला दिलेल्या मुलाखतीत नमाशी मिमोहबद्दल म्हणाला, “त्याचा जन्म सुपरस्टार होण्यासाठीच झाला आहे, त्याच्यामध्ये सुपरस्टार होण्याची क्षमता आहे, पण इंडस्ट्री इतर स्टार किड्समध्येच खूप व्यग्र आहे. अभिषेक (बच्चन) सरांइतक्याच संधी माझ्या भावाला मिळाल्या असत्या तर माझा भाऊ आज सुपरस्टार झाला असता हे मी रेकॉर्डवर आत्मविश्वासाने सांगू शकतो.”

पाच वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणारा अभिनेता ठेवतोय रोजे, म्हणाला, “पाणी व कॉफीशिवाय १२-१४ तास…”

मिथुन चक्रवर्तींचा मुलगा मिमोहने २००८ साली ‘जिमी’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘हॉन्टेड थ्रीडी’ आणि ‘लूट’ सारख्या काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तो स्क्रीनवर दिसला नाही. मागच्या वर्षी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘जोगिरा सा रा रा’ चित्रपटात तो सहाय्यक भूमिकेत झळकला होता. “लोक ‘जिमी’कडे मोठ्या प्रॉडक्शनच्या चित्रपटापेक्षा एक मोठा फ्लॉप म्हणून जास्त पाहतात. जर मिमोहला अभिषेकइतक्या संधी मिळाल्या तर तो खूप यशस्वी होईल,” असं नमाशी म्हणाला.

सलमान खान, शाहरुख खानचे चित्रपट नाकारले, वैयक्तिक आयुष्यातही आलं अपयश; दोन घटस्फोटांनंतर ‘ही’ अभिनेत्री आता…

बॉलीवूड आपल्या भावाला गांभीर्याने घेत नाही असं नमाशीला वाटतं. “मला वाटतं की तो एक असा अप्रतिम अभिनेता आहे , ज्याला दुर्दैवाने बॉलीवूड अजूनही गांभीर्याने घेत नाही,” असं मत नमाशीने व्यक्त केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithun chakraborty son namashi says his brother mimoh would be superstar if he gets chances like abhishek bachchan hrc