‘गरिबांचा अमिताभ बच्चन’ म्हणून ज्यांच्या चित्रपटांना बऱ्याचदा हिणवलं गेलं त्या मिथुन चक्रवर्ती यांचे भारतातच नाही तर परदेशातही खूप चाहते आहेत. बॉलिवूडमधला ८० ते ९० हा काळ मिथुन यांनी चांगलाच गाजवला आहे. त्यांच्या त्या काळातील चित्रपटांची लोक आज खिल्ली उडवतात, पण त्याच चित्रपटांमुळे मिथुन चक्रवर्ती टिकून आहेत. मिथुन चित्रपटसृष्टीत टिकू शकले ते केवळ त्यांच्या मेहनतीच्या जोरावर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबरोबरच मिथुन यांना बी ग्रेड चित्रपटावरूनही बरंच ट्रोल केलं गेलं. देशातील एक वर्ग आवडीने मिथुन यांचे हे चित्रपट बघायचा, पण १९९८ मध्ये आलेल्या ‘गुंडा’ या चित्रपटाने मात्र सगळा कायापालटच केला. दिग्दर्शक कांती शहा यांचा हा चित्रपट बराच बोल्ड होता. मिथुनसह यात मुकेश ऋषि, शक्ति कपूर, मोहन जोशी यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याच चित्रपटाबद्दल मिथुन यांचे सुपुत्र नमाशी चक्रवर्ती याने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : काळजाचा ठोका चुकवणारे सर्वात बीभत्स ‘स्लॅशर’ चित्रपट; एकट्याने बघायचं अजिबात करू नका धाडस

आपल्या वडिलांनी हा चित्रपट करायला नको होता असं नमाशी याने स्पष्ट केलं. ‘इटाइम्स’शी संवाद साधताना नमाशी म्हणाला, “मला वाटतं गुंडा हा एक अत्यंत कुप्रसिद्ध चित्रपट आहे. आजच्या पिढीतील लोकांना वाटतं की असे चित्रपट फक्त माझे वाडीलच करू शकतात, गुंडा हा चित्रपट त्याच्या वाईट असण्यामुळेच लोकप्रिय झाला. मलाही तो चित्रपट आवडतो, पण मला तेव्हा माझ्या वडिलांची नैतिक पातळी बघता त्यांनी हा चित्रपट करायला नको होता असं मला वाटतं. या चित्रपटाने माझ्या वडिलांची प्रतिष्ठा खराब झाली.”

मिथुन यांचा मुलगा नमाशी हासुद्धा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘बॅड बॉय’ या चित्रपटातून तो या सृष्टीत पाऊल टाकणार आहे. यात मिथुन चक्रवर्तीही एका खास भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय यामध्ये जॉनी लिवर, राजपाल यादव, दर्शन जरीवाला हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithun chakraborty son namashi says that film gunda spoiled his father reputation avn