बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. पण, त्यांची लेक दिशानी ही दत्तक घेतलेली आहे. त्यांनी व त्यांच्या पत्नी योगिता बाली यांनी मिळून मुलीला दत्तक घेतलं होतं. एका बंगाली वृत्तपत्रात चक्रवर्ती कुटुंबाने बातमी वाचली, त्यात एका मुलीला तिच्या अज्ञात पालकांनी कचराकुंडीजवळ सोडून दिल्याचं लिहिलं होतं. ही बातमी वाचल्यावर मिथुन चक्रवर्तींना धक्का बसला आणि त्यांनी तिच्याबद्दलची माहिती मिळवली.

थिएटरमध्ये सीटखाली सापडलेली चिमुरडी; उंदरांनी कुरतडलेलं शरीर, प्रकाश झा यांनी दत्तक घेतली होती लेक दिशा

त्या मुलीचा शोध घेतल्यानंतर तिला दत्तक घ्यायचं मिथुन चक्रवर्ती यांनी ठरवलं, त्यांनी पत्नी योगिता बाली यांच्याशी याबद्दल चर्चा केली, त्यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आणि मुलीला दत्तक घेण्यासाठी कागदोपत्री कारवाई सुरू केली. अशा रितीने ती कचराकुंडीजवळ सापडलेली मुलगी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची लेक झाली. त्यांनी तिचं नाव दिशानी ठेवलं.

दिशानी फक्त आई-वडिलांचीच नाही, तर आपल्या तिन्ही भावांचीही लाडकी आहे. तीन भावांना दिशानीच्या येण्याने हक्काची बहीण मिळाली आणि त्यांचं कुटुंब पूर्ण झालं. आता दिशानी मोठी झाली आहे. चक्रवर्ती कुटुंबाने तिची पूर्ण काळजी घेतली. तिने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून शिक्षण घेतलंय. तिने आतापर्यंत ‘होली स्मॉक’ व ‘अंडरपास’ या दोन शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलंय.

दिशानीने करण जोहरच्या ‘स्टूडेंट ऑफ द ईअर’ चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं, असं म्हटलं जातं. मुख्य म्हणजे दिशानीचा आवडता हिरो सलमान खान आहे आणि तिला सलमानबरोबर काम करायचं आहे.

Story img Loader