एका बॉलीवूड अभिनेत्याच्या दत्तक मुलीने हॉलीवूडमध्ये काम करत कौतुकाची थाप मिळवली आहे. वडिलांप्रमाणे अभिनय करत याच क्षेत्रात नाव कमवायचं हेच तिचं स्वप्न होतं. ते स्वप्न ती पूर्ण करताना दिसत आहे. फोटोत दिसणारी ही मुलगी म्हणजे दिशानी चक्रवर्ती होय. ती अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांची मुलगी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन चक्रवर्ती-योगिता बाली यांना तीन मुलं आणि एक मुलगी अशी चार अपत्ये आहेत. मोठा मुलगा मिमोह चक्रवर्ती, दुसरा मुलगा रिमो चक्रवर्ती आणि तिसरा मुलगा नमाशी चक्रवर्ती. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव दिशानी चक्रवर्ती आहे. तिलाही अभिनयाची आवड आहे आणि त्यातच तिला करिअर करायचं आहे. दिशानीला मिथुन व त्यांच्या पत्नी योगिता यांनी दत्तक घेतलं होतं.

प्रसिद्ध अभिनेत्रीने एअरलाइन कॅप्टनशी केलं लग्न, राजस्थानमध्ये मराठी लूकने वेधलं लक्ष, पाहा Photos

दिशानी चक्रवर्तीचा जन्म कोलकाता इथं झाला होता. एका बंगाली वृत्तपत्रात बातमी आली होती की जन्मानंतर तिच्या कुटुंबाने सोडून दिलेली एक मुलगी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली. ही बातमी वाचल्यावर मिथुन चक्रवर्तींना धक्का बसला आणि त्यांनी तिच्याबद्दलची माहिती मिळवली. त्या मुलीचा शोध घेतल्यानंतर तिला दत्तक घ्यायचं त्यांनी ठरवलं, पत्नी योगिता बाली यांच्याशी याबद्दल चर्चा केली, त्यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आणि मुलीला दत्तक घेण्यासाठी कागदोपत्री कारवाई सुरू केली. अशा रितीने ती कचराकुंडीजवळ सापडलेली मुलगी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची लेक झाली. त्यांनी तिचं नाव दिशानी ठेवलं.

रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे जॅकी भगनानी, बहीण व भाच्यांबरोबर शेअर केलेत खास फोटो

योगिता व मिथुन यांनी दिशानीला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं आणि तिला प्रेम दिलं. दिशानी सोशल मीडियावरून तिचं पालक व भावांसाठीचं प्रेम व्यक्त करत असते. दिशानी तिचे प्राथमिक शिक्षण भारतात पूर्ण केलं, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेतील लॉस एंजेलिस इथं गेली. तिने न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून अभिनयात पदवी घेतली आहे. दिशानीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे आणि तिचा आवडता हिरो सलमान खान आहे.

अभिनेत्याने शेती करण्यासाठी सोडला अभिनय, मोठं नुकसान झालं अन् आता कर्ज फेडण्यासाठी…; म्हणाला, “पाच वर्षे…”

दिशानीने २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या हॉलीवूड शॉर्ट फिल्म ‘गिफ्ट’ मधून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती. ती शेवटची २०२२ मध्ये ‘द गेस्ट’ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. या शॉर्ट फिल्मचे आणि तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिला तिचे वडील मिथुन चक्रवर्ती यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले, जे तिला तिच्या कामातून दाखवायचं आहे, असं दिशानीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

दिशानी हॉलिवूड अभिनेता कोडी सुलेकबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तिने त्याच्यासोबतचे अनेक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithun chakraborty yogeeta bali adopted daughter dishani working in hollywood hrc