लातूर ग्रामीणचे आमदार व अभिनेता रितेश देशमुखचे भाऊ धिरज देशमुख हे राजकारणात असले तरी त्यांचं सिनेसृष्टीशी जवळचं नातं आहे. त्यांचे भाऊ व वहिनी अर्थात रितेश-जिनिलीया अभिनयक्षेत्रात आहे, पण इतकंच नाही तर त्यांच्या सासरची मंडळीही सिनेसृष्टीतलीच आहे. होय, धिरज देशमुखांची पत्नी दिपशिखा प्रसिद्ध चित्रपट निर्माते वाशू भगनानी यांची मुलगी आहे. दिपशिखा जॅकी भगनानीची बहीण व अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची नणंद आहे.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग व अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी यांचं २१ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्न झालं. हे नवविवाहित जोडपं लग्नानंतर बऱ्याच इव्हेंट्सना हजेरी लावत आहे. ते अनेक कार्यक्रमांना तसेच कुटुंबाबरोबर खरेदी करायला, जेवायला जाताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात रकुल-जॅकी व त्यांच्यासह रकुलच्या सासूबाई दिसत आहेत.
रकुल व धिरज देशमुखांच्या सासूबाईंचं नाव पूजा भगनानी आहे. नुकताच जॅकी व रकुलचा एक व्हिडीओ समोर आला आहेत, ज्यात त्या लेक व सुनेबरोबर पोज देताना दिसतात. रकुल व जॅकी पापाराझींना पोज देत असतात तर पूजा समोर निघून जाता, मग रकुल त्यांना आवाज देते आणि ते तिघेही फोटोसाठी एकत्र पोज देतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी रकुलचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. खूप छान जोडी, संस्कारी सून अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. दरम्यान रकुल व जॅकीच्या लग्नाबद्दल बोलायचं झाल्यास दोघांनी गोव्यात २१ फेब्रुवारीला लग्न केलं. त्यांच्या लग्नाला बॉलीवूड सेलिब्रिटींस राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती.