शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. अखेर ७ सप्टेंबर रोजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७० कोटींची छप्परफाड कमाई केली. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातही या चित्रपटाची चांगलीच हवा आहे. जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर या चित्रपटातील बरेच सीन्स, डायलॉग तसेच फोटोज व्हायरल होत आहेत. याबरोबरच चित्रपटातील शाहरुख खानचा क्लायमॅक्सच्या मोनोलॉगचीही चांगलीच चर्चा होत आहे. या मोनोलॉगमुळे आणि चित्रटात इतरही गंभीर समस्यांवर केलेल्या भाष्यामुळे याबद्दल होणाऱ्या चर्चेला एक राजकीय वळण मिळालं आहे. विरोधी पक्षांनी या चित्रपटाला चांगलंच उचलून धरलं आहे.

आणखी वाचा : “शाहरुख खान कधीच ‘नमस्ते’ म्हणत नाही…” विवेक अग्निहोत्रींच्या जुन्या वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेत्याची प्रतिक्रिया

कॉँग्रेसच्या माजी खासदारांनी हा चित्रपट संसदेत दाखवण्याचे आव्हान दिले तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. नुकतंच त्यांनी मुंब्रा आणि कळवा येथील विद्यार्थ्यांसाठी जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘जवान’चा एक खास शो आजोजित केला होता. केवळ तरुण कॉलेजवयीन विद्यार्थ्यांना ‘जवान’ जितेंद्र आव्हाड यांनी मोफत दाखवला.

नुकतंच जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत या शोला मिळालेल्या तरुणांच्या प्रतिसादाबद्दल माहीती दिली.

या ट्वीटमध्ये हिंदीतून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्याचा अर्थ काहीसा असा –

“जनतेची विचारधारा तयार होण्यात चित्रपट या माध्यमाचं खूप मोठं योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर असे बरेच चित्रपट आले ज्यामुळे समाजाला एक दिशा मिळाली. मदर इंडिया, नया दौर, सलाम बॉम्बे, अमर अकबर एंथोनी से लेके लगान, स्वदेस, रंग दे बसंतीसारख्या चित्रपटातून अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची अन् एक सुदृढ समाज निर्माण करण्याची ताकद लोकांना मिळाली. गेल्या काही वर्षात एका विशिष्ठ प्रकारच्या राजकीय विचारधारेला पूरक असे चित्रपट बनवले गेले ज्यामुळे समाजात एक धार्मिक अन् जातीय तेढ निर्माण झाली.

शाहरुख खान व अॅटली यांचा ‘जवान’ या चित्रपटातून आजच्या तरुणांना एक वेगळी प्रेरणा मिळेल. एक योग्य नेता निवडणं हे किती महत्त्वाचं असतं हे तरुणांना हा चित्रपट पाहून समजेल अन् हा विषय चित्रपटात फार उत्तमरित्या सादर केला आहे. हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहायला हवा व यासाठी मी माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न केला आहे. १८ टे २५ या वयोगटातील तरुणांसाठी विवियाना मॉल येथे या चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता. जास्तीत जास्त तरूणांनी हा चित्रपट पहावा यासाठी मी प्रयत्न करेन, येणाऱ्या काही दिवसांत या शोजची संख्या आणखी वाढेल.”

या ट्वीटबरोबरच या चित्रपटगृहातील एक व्हिडीओही जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे. या ट्वीटवर बऱ्याच लोकांनी कॉमेंट करत ‘जवान’चं प्रचंड कौतुक केलं आहे. ‘जवान’मध्ये शाहरुख खानसह विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदूकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla jitendra awhad arranged a free show of shahrukh khan starrer jawan for college students avn