‘बिग बॉस १६’ मधील स्पर्धक आणि बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान याच्या अडचणीत दिवसेंदिवस आणखीनच भर पडत आहे. एकीकडे साजिद बिग बॉसच्या घरात वेगवेगळे टास्क करण्यात मग्न आहे तर दुसरीकडे बाहेर त्याच्याविरोधात रोज कुणीतरी नवीन अभिनेत्री येऊन वक्तव्य देत आहे. शर्लिन चोप्रा, रानी चैटर्जी, कनिष्का सोनी यांच्यानंतर आता आणखी एका मॉडेल अभिनेत्रीने साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत.

मॉडेल अभिनेत्री शीला प्रिया सेठ हिने ८ वर्षांपूर्वी साजिद खानने तिच्याशी गैरव्यवहार केल्याचा आरोप लावला आहे. तमिळ कन्नड आणि इतर दाक्षिणात्य चित्रपटात काम केलेल्या शीलाने नुकतंच यावर मौन सोडलं आहे. केवळगैरव्यवहारच नाही तरतिला सर्जरी करायचा सल्लादेखील साजिद खानने दिल्याचं शीलाने कबूल केलं आहे.

Singer Dhvani Bhanushali acting debut
गायिका ध्वनी भानुशालीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
kangana Ranaut is disappointed after the film Emergency did not get Censor Board certification
हतोत्साहित करणारे, अन्यायकारक! ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे कंगना राणावत निराश
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
Kranti Redkar twin daughters started crying After watching the movie Kakan
Video: “मम्मा, तू चुकीचा चित्रपट बनवला…” ‘काकण’ची कथा ऐकून क्रांती रेडकरच्या मुली ढसाढसा लागल्या रडू, म्हणाल्या…
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित

आणखी वाचा : आरारारा खतरनाक….! बुलेटवर केक कापत चंद्रकांत पाटील यांनी साजरा केला प्रवीण तरडेंचा वाढदिवस

एका वृत्तवाहिनशी संवाद साधताना शीला म्हणाली, “मी साजिद खानला सर्वप्रथम एका चित्रपटाच्या निमित्ताने २००८ साली भेटले. पण तेव्हा त्याने माझ्याबरोबर गैरव्यवहार केला. मी जेव्हा त्याला भूमिकेसाठी भेटायला गेले तेव्हा तो तब्बल ५ मिनिटं माझ्या प्रायव्हेट पार्टकडे एकटक बघत होता. त्यानंतर त्याने मला माझे स्तन वाढवण्यासाठी सर्जरीचा पर्याय सुचवला. एवढंच नाही तर स्तनाचा आकार वाढवण्यासाठी रोज तेलाने मालीश करायचासुद्धा सल्ला दिला.”

सध्या बिग बॉसमधील वर्तणूकीवरूनही प्रेक्षक साजिद खानवर नाराज आहेत. साजिदचं महिलांशी वर्तन योग्य नसल्याचं प्रेक्षक सोशल मीडियावर सांगत आहेत. बाहेरही दिवसागणिक साजिद विरोधात हे वातावरण आणखी खराब होत आहे. या नव्या मॉडेलच्या वक्तव्यामुळे साजिदचा सोशल मीडियावर तीव्र निषेध करण्यात येत आहे.