Poonam Pandey Died at 32: आपल्या बोल्ड लूक्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हीचे निधन झाले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी सरव्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग)मुळे तिचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. पूनमच्या निधनामुळे बऱ्याच लोकांना धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवरुन तिच्या निधनाबद्दल माहिती कळवली.

पूनम पांडेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत तिच्या टीमने तिच्या फॉलोअर्सना ही बातमी दिली. तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून अद्याप याविषयी पूनमच्या कुटुंबियांनी या बातमीची पुष्टी केलेली नाही. पूनम ही सरव्हायकल कॅन्सरच्या चौथ्या स्टेजला होती अन् नुकतंच तिला या आजाराबद्दल समजलं होतं.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Japanese actress Miho Nakayama found dead
प्रसिद्ध अभिनेत्री घरातील बाथटबमध्ये आढळली मृतावस्थेत
Allu Arjun
‘पुष्पा 2’ च्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू, अल्लू अर्जुनने २५ लाखांच्या मदतीचं दिलं आश्वासन
in Pavana Dam in Maval taluka on Wednesday evening when two persons drowned after their boat overturned in water
पवनानगर बोट दुर्घटना, तरुणांच्या मृत्यूप्रकरणी बंगला मालक , बोट मालकांवर गुन्हा दाखल

पूनमच्या अकाऊंटवर तिच्या मॅनेजरने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिण्यात आलं की, “ही सकाळ आपल्या सगळ्यांसाठी फार खडतर असणार आहे. तुम्हा सगळ्यांना ही बातमी देताना अतिशय दुःख होत आहे की आपल्या पुनमचे सरव्हायकल कॅन्सरमुळे निधन झाले आहे. या दुखवट्याच्या काळात कृपया तिच्या कुटुंबियांना व नातेवाईकांना यातून सावरण्यासाठी थोडा वेळ द्या.”

या पोस्टवर पूनमच्या चाहत्यांनी कॉमेंट करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे. २०१३ मध्ये पूनमने ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीलाच धक्का बसला आहे. पूनम तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असायची. नुकतीच पूनमने कंगनाच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये हजेरी लावली होती, परंतु ती या शोमध्ये जिंकू शकली नाही.

Story img Loader