Sidharth Malhotra Viral Ramp Walk : बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा एका व्हिडीओमुळे खूपच चर्चेत आला आहे. नुकताच त्याने दिल्लीत शांतनु आणि निखिलसाठी रॅम्प वॉक केला. पण सिद्धार्थ मल्होत्राचा हा रॅम्प वॉक खूप चर्चेत आला. याच कारण होती मॉडल. सिद्धार्थ आणि मॉडलच्या केमिस्ट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांच्या रॅम्प वॉक व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळेच मॉडलने आता थेट सिद्धार्थची पत्नी कियारा अडवाणीची माफी मागितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ( Sidharth Malhotra ) रॅम्प वॉकचा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, सिद्धार्थसह रॅम्प वॉक करणारी मॉडल एलिसिया कौर कधी अभिनेत्याचा कोट खेचताना दिसत आहे. तर कधी त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत आहे. एवढंच नव्हे तर सिद्धार्थच्या जास्त जवळ जाऊन पोज देताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सिद्धार्थचा रॅम्प वॉक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: “वर्णद्वेष बंद करा”, ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले, “सावळ्या अभिनेत्री चालत नाहीत का?”

“कियारा मी सहन नसतं केलं”, “कियारा कोपऱ्यात बसून रडतं असेल”, “सिद्धार्थ तुला घरी पण जायचं आहे. थोडं सांभाळून”, “सिद्धार्थ कियारा तुझी घरी वाट पाहात आहे”, “वहिणीला आता सांगावं लागले”, “कियारा हे तुला आवडेल का?”, अशा अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटल्या आहेत. रॅम्प वॉकचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडल एलिसिया कौरने कियारा अडवाणीची माफी मागितली आहे.

हेही वाचा – Video: खुशबू तावडे व संग्राम साळवीच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार, ‘या’ महिन्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार

मॉडल कियाराची माफी मागत काय म्हणाली?

मॉडलने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. व्हिडीओवर तिने “सॉरी कियारा” असं लिहिलं आहे. तसंच अजून एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये मॉडलने लिहिलं आहे, “हे आमचं काम आहे.” या दोन्ही इन्स्टाग्राम स्टोरी मॉडलने सिद्धार्थला टॅग केल्या आहेत.

Sidharth Malhotra
Sidharth Malhotra

सिद्धार्थ मल्होत्राने रॅम्प वॉक दरम्यान काळ्या रंगाचा सुंदर सूट परिधान केला होता. यावेळी सिद्धार्थने ( Sidharth Malhotra ) हृतिक रोशनची गर्लफ्रेंड, प्रसिद्ध गायिका सबा आजादबरोबर डान्स केला.

सिद्धार्थ मल्होत्राच्या ( Sidharth Malhotra ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो आगामी चित्रपटाचं चित्रीकरण उत्तराखंडमध्ये करत आहे. हा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही माहिती अधिकृतरित्या समोर आलेली नाही. सिद्धार्थ शेवटचा ‘योद्धा’ चित्रपटात झळकला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Model apologises to kiara advani after video viral with sidharth malhotra pps